काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:59 IST2020-12-05T04:59:48+5:302020-12-05T04:59:48+5:30
यावेळी आमदार राजू आवळे म्हणाले, या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) ...

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष
यावेळी आमदार राजू आवळे म्हणाले, या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रम घेऊन संघटितपणे प्रयत्न केले. त्यामुळे भाजपचा दारुण पराभव करीत बारा वर्षांचे वर्चस्व संपुष्टात आणले. यावेळी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कपिल पाटील, भीमराव दबडे, एम. के. चव्हाण, रामभाऊ लोकरे, हर्षवर्धन चव्हाण, नितीन सणगर, शकील जमादार, सतीश लोहार, शिवराम सिद, गजानन कांबळे, तसेच युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.