शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यातील लाठीहल्ल्याचा निषेध: कोल्हापुरातील इचलकरंजीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 17:48 IST

निषेध मोर्चातही हजारोंचा सहभाग

अतुल आंबीइचलकरंजी : जालना जिल्ह्यात मराठा कार्यकर्त्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ इचलकरंजी सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व व्यापारी, उद्योजक, हातगाडे, मालवाहतूक, रिक्षा, शाळा, महाविद्यालये कडकडीत बंद राहिले. दरम्यान, शहरातील मुख्य मार्गांवरून काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते.अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. तेथील आंदोलकांवर पोलिसांनी बेछूट लाठीमार केल्याने अनेकजण जखमी झाले. या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. त्या अनुषंगाने येथील मराठा समाजाने बुधवारी इचलकरंजी बंदची हाक दिली होती. त्याला प्रतिसाद देत सर्वांनी आपले व्यवहार, व्यवसाय बंद ठेवले. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या चौकांमध्ये शुकशुकाट जाणवत होता. निषेध मोर्चाची सुरूवात बुधवारी सकाळी दहा वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून तेथून मुख्य मार्गावरून मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मलाबादे चौक असा मार्गस्थ झाला. मोर्चा महात्मा गांधी पुतळा येथे पोहचल्यानंतर प्रांताधिकाऱ्यांचे प्रतिनिधी अप्पर तहसीलदार मनोजकुमार ऐतवडे, शिरस्तेदार काटकर यांना मागण्यांचे निवेदन दिले.वाहतूक बंदमुळे पायपीटबंदमुळे येथील एस.टी.च्या २३८ फेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे प्रवाशांना पायपीट करावी लागली.कडक बंदोबस्तआंदोलनासाठी एक अप्पर पोलिस अधीक्षक, २ उपअधीक्षक, ४ निरीक्षक, ३२ सहायक निरीक्षक, ३ स्ट्रायकिंग, गृहरक्षक दल, शहर वाहतूक शाखा कर्मचारी, निर्भया पथक असा कडक बंदोबस्त तैनात केला होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणichalkaranji-acइचलकरंजी