जयसिंगपूरकरांनीही जपलं रक्ताचं नातं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:15 IST2021-07-12T04:15:44+5:302021-07-12T04:15:44+5:30
नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं या लोकमतच्या राज्यव्यापी महारक्तदान अभियानाला शिरोळ विभागातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कोरोनामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा ...

जयसिंगपूरकरांनीही जपलं रक्ताचं नातं
नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं या लोकमतच्या राज्यव्यापी महारक्तदान अभियानाला शिरोळ विभागातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कोरोनामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने या शिबिराला व्यापक स्वरूप देण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून क्रांती गणेशोत्सव मंडळाच्या सहकार्याने जयसिंगपूरमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले. कोरोनाच्या संकटकाळात रक्तदानाच्या माध्यमातून जीवनदान देण्याचा लोकमतने सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे, अशा प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी दिल्या. या शिबिरास सिद्धिविनायक ब्लड बँक मिरज व हिंदरत्न प्रकाशबापू ब्लड बँक सांगली यांचे सहकार्य लाभले. यावेळी लोकमतचे वृत्तसंपादक चंद्रकांत कित्तुरे व क्रांती मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते रक्तदात्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी जयसिंगपूर प्रतिनिधी संदीप बावचे, तानाजी तारळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
शुक्राचार्य यांनी ९४ वेळा केले रक्तदान
सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे शुक्राचार्य (बंडू) महादेव उरुणकर यांनी लोकमतच्या रक्तदान शिबिरात ९४ वेळा रक्तदान करून उच्चांक केला आहे. त्यांचा क्रांती गणेशोत्सव मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
फोटो - ११०७२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी ९४ वेळा रक्तदान करणारे शुक्राचार्य उरणकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.