जयसिंगपूर कॉलेजची विद्यार्थिनी विद्यापीठात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:23 IST2021-04-08T04:23:58+5:302021-04-08T04:23:58+5:30

साबियानाज बागवान हिला डॉ. चंदुलाल दुबे पुरस्कार, डॉ. आर. व्ही. चिटणीस हिंदी पारितोषिक, महाकवी भूषण अकादमी पुरस्कार व कै. ...

Jaisingpur College student first in the university | जयसिंगपूर कॉलेजची विद्यार्थिनी विद्यापीठात प्रथम

जयसिंगपूर कॉलेजची विद्यार्थिनी विद्यापीठात प्रथम

साबियानाज बागवान हिला डॉ. चंदुलाल दुबे पुरस्कार, डॉ. आर. व्ही. चिटणीस हिंदी पारितोषिक, महाकवी भूषण अकादमी पुरस्कार व कै. गुरुवर्य कल्लाप्पा घाटे गुरुजी पारितोषिक असे चार पुरस्कार तिला नुकतेच प्रदान करण्यात आले. तसेच एम.ए.भाग-१ मध्ये बागवान ही हिंदी विषयात विद्यापीठात प्रथम आली होती. त्यावेळी तिला विद्यापीठाची स्कॉलरशिप मिळाली होती. तिला प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार, डॉ. सुनील बनसोडे, सुवर्णा संसुद्धी, अंजना चौगुले, प्रा. कविता चानकने, सोनाली जगदाळे, डॉ. वृषाली मिणचेकर यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. यावेळी डॉ. सुभाष अडदंडे, डॉ. महावीर अक्कोळे, पद्माकर पाटील, डॉ. सुरत मांजरे, डॉ. नंदकुमार कदम, संजय मगदूम यांनी तिचे अभिनंदन केले.

फोटो - ०७०४२०२१-जेएवाय-०३

फोटो ओळ - जयसिंगपूर कॉलेज येथे साबियानाज बागवान हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार, डॉ. सुरज मांजरे, डॉ. सुनील बनसोडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Jaisingpur College student first in the university