जयसिंगपूर संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:27 IST2021-03-01T04:27:11+5:302021-03-01T04:27:11+5:30

कुरुंदवाडमध्ये संत रोहिदास जयंती कुरुंदवाड : येथील गोठणपूर भागातील चर्मकार समाज विठ्ठल मंदिरामध्ये चर्मकार समाजाच्या वतीने संत रोहिदास ...

Jaisingpur Brief News | जयसिंगपूर संक्षिप्त बातम्या

जयसिंगपूर संक्षिप्त बातम्या

कुरुंदवाडमध्ये संत रोहिदास जयंती

कुरुंदवाड : येथील गोठणपूर भागातील चर्मकार समाज विठ्ठल मंदिरामध्ये चर्मकार समाजाच्या वतीने संत रोहिदास जयंती साजरी करण्यात आली. मंदिरातील पुजारी शशिकांत गायकवाड व रमेश गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सुनील गायकवाड, नागेश गायकवाड, विजय गायकवाड, दादासो गायकवाड, आण्णासो गायकवाड, उमेश गायकवाड, संदीप गायकवाड यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

-

उदगाव, चिंचवाडमध्ये संत रोहिदास जयंती

उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात संत रोहिदास महाराज यांना अभिवादन करण्यात आले. सरपंच कलिमून नदाफ, उपसरपंच अ‍ॅड. हिदायत नदाफ यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सलीम पेंढारी, अरुण कोळी, दिलीप कांबळे, रुक्मिणी कांबळे, श्रीकांत सुतार यांच्यासह सदस्य उपस्थित होते. रोहिदासनगरमध्ये राममंदिरात संत रोहिदास महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी दत्ता माने, राजेश ठोमके, बाबासो बरमे, दीपक ठोमके, प्रकाश ठोमके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. चिंचवाड (ता. शिरोळ) येथील बेघर वसाहत येथे संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. सरपंच ज्योती काटकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी अमोल माने, जयेश ठोमके, महादेव भंडारे, विजय कांबळे उपस्थित होते.

----------------------

रुग्णांना फळे वाटप

दत्तवाड : येथील एस. पी. युवा फौंडेशनच्या वतीने संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. यावेळी संजय पोवार, अर्जुन धुमाळे, अभिषेक पोवार, सौरभ पोवार, स्वप्निल पोवार, अभिषेक दळवाई, सुनील धुमाळे, धोंडीराम धुमाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Jaisingpur Brief News