जैन संघटना घेणार सातशे अनाथ पाल्यांचे शैक्षणिक जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:16 IST2021-07-03T04:16:21+5:302021-07-03T04:16:21+5:30
रूकडी माणगाव : राज्यात कोरोनामुळे अनाथ झालेल्या पाचवी ते बारावीमधील पाल्याची शैक्षणिक जबाबदारी भारतीय जैन संघटना घेणार आहे. ...

जैन संघटना घेणार सातशे अनाथ पाल्यांचे शैक्षणिक जबाबदारी
रूकडी माणगाव : राज्यात कोरोनामुळे अनाथ झालेल्या पाचवी ते बारावीमधील पाल्याची शैक्षणिक जबाबदारी भारतीय जैन संघटना घेणार आहे. या पाल्यांची शैक्षणिक, निवास व जेवणाची मोफत व्यवस्था भारतीय जैन संघटनाच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे महाराष्ट्र राज्य सल्लागार अभिनंदन खोत यांनी दिले.
कोविडमुळे अनाथ झालेल्या मुला-मुलींचे नुकसान झाले असून त्यांच्या कुटुंबातील आईवडील गेल्याने अशा पाल्यांचे मानसिक, कौटुंबिक खच्चीकरण झाले असून या पाल्यांना आधार देणे गरजेचे आहे. त्याना मानसिक तणावातून बाहेर काढून मुख्य प्रवाहाबरोबर त्याचे आत्मविश्वास वाढविणे गरजेचे आहे. भारतीय जैन संघटना नेहमीच संकट काळी मदतीसाठी अग्रेसर असते.
कोरोनाच्या काळात जे पाल्य अनाथ झाले आहेत त्याची शोधमोहीम सुरू असून यामध्ये प्रथम ज्याचे आई वडील हरविले आहेत किंवा वडील अथवा आई कोरोनाने मयत झाले आहे व दारिद्र्यरेषेतील कुटुंबांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे, अशा सातशे पाल्यांचे वाघोली येथे मराठी माध्यमिक शाळेत प्रवेश व तेथे मोफत राहाणे, जेवण व शिक्षणाची व्यवस्था करण्यात येईल यासाठी भारतीय जैन संघटनेचे पारस ओसवाल, गिरीश कर्नावट, प्रकाश मुगळी, राजगोंडा पाटील, दीपक पाटील, मीना बोरगावे, सातारा, वैशाली देसाई, सचिन कांते, पंकज शहा, महावीर कित्तूर, बी. एन. पाटील, राजाभाऊ शहा यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.