शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील जैन मंदिर पुन्हा उभारा, जैन समाजाचा शासनाला अक्षय्य तृतियेचा अल्टीमेटम; कोल्हापुरात आक्रोश मोर्चा

By संदीप आडनाईक | Updated: April 25, 2025 14:15 IST

कोल्हापूर : मुंबईतील विले-पार्ले पूर्व येथील ३२ वर्षापासूनचे जुने पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर महापालिका प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने पाडले. हे ...

कोल्हापूर : मुंबईतील विले-पार्ले पूर्व येथील ३२ वर्षापासूनचे जुने पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर महापालिका प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने पाडले. हे जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ दक्षिण भारत जैन सभेच्या नेतृत्वाखाली सकल जैन समाजाने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. शासनाने अक्षय्य तृतियेपर्यंत पाडलेले जैन मंदिर पुन्हा उभा करण्याची घोषणा करावी, असा अल्टीमेटम यावेळी समाजाने दिला.लढेंगे और जितेंगे, मंदिर वही बनायेंगे, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बडतर्फ करा, जैन समाजावर अन्याय करणाऱ्यांचा धिक्कार असो, हा आवाज कोणाचा, लढवय्या क्षत्रियांचा, हम कम है लेकिन कायर नही, धर्मावरील अन्याय सहन करणार नाही, अल्पसंख्याकांवरील अन्याय बंद करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.सकाळी १० वाजता दसरा चौकात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घातल्यानंतर मोर्चास प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चाची सांगता झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे दिलेले निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्विकारले. या मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, आमदार अमल महाडिक, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, चेअरमन रावसाहेब पाटील, खजिनदार संजय शेटे, जैन महामंडळाचे अध्यक्ष आणि अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य ललित गांधी, सहखजिनदार अरविंद मजलेकर, दिगंबर जैन बोर्डिंगचे चेअरमन सुरेश रोटे, माजी नगरसेवक राजू लाटकर, राहुल चव्हाण यांनी केले.

फलक, पंचरंगी ध्वजाने लक्ष वेधलेमोर्चाच्या सुरुवातीला पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली. मोर्चात सहभागी जैन समाजाच्या कार्यकर्त्यांनी विविध मागण्यांचे फलक हाती घेतले होते. गळ्यात पंचरंगी उपरणे आणि हातात घेतलेले पंचरंगी ध्वज लक्ष वेधून घेत होते. निषेध म्हणून अनेकांनी दंडावर काळ्या फीती बांधल्या होत्या.

या आहेत मागण्या

  • विले-पार्ले पूर्व मुंबईतील जैन मंदिर उध्वस्त करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे तातडीने निलंबन करा
  • जैन मंदिराचे त्याच जागेवर पुनर्निमाण करण्याचा आदेश मुंबई महापालिका आणि नगरविकास खात्याला द्यावा
  • सर्व जैन तीर्थक्षेत्रे, जैन मंदिरे, साधू-साध्वी, श्रावक-श्राविका यांचे संरक्षण करा, त्यांच्याशी संबंधित समस्यांचे निराकरण करावे
  • जैन धार्मिक अल्पसंख्यांक शिक्षण संस्थांतील नोकर भरतीच्या अधिकारात शासन, विद्यापीठ अनुदान आयोग व विद्यापीठांचा बेकायदेशीर हस्तक्षेप थांबवण्याचा आदेश द्यावा
टॅग्स :kolhapurकोल्हापूरJain Templeजैन मंदीरagitationआंदोलन