शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Ganeshotsav : यंदा अवकाशात झेपावणार ‘जय शिवराय’चा ‘उपग्रह‘

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 15:38 IST

गणेशोत्सव म्हटले की, तांत्रिक देखाव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या शिवाजी उद्यमनगरकडे आबालवृद्ध गणेशभक्तांचे आपोआप पाय वळतात. त्यात जय शिवराय मित्रमंडळाने आपले वेगळेपण जपले आहे. यंदा हीच परंपरा कायम राखत या मंडळाने ‘इस्रो’चे ‘स्पेस स्टेशन’ व त्यातून आकाशात ३० फुटांपर्यंत झेपावणारा ‘उपग्रह’ याची प्रतिकृती साकारण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देयंदा अवकाशात झेपावणार ‘जय शिवराय’चा ‘उपग्रह‘शहरात गणेशोत्सव देखाव्यांची लगबग सुरू

कोल्हापूर : गणेशोत्सव म्हटले की, तांत्रिक देखाव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या शिवाजी उद्यमनगरकडे आबालवृद्ध गणेशभक्तांचे आपोआप पाय वळतात. त्यात जय शिवराय मित्रमंडळाने आपले वेगळेपण जपले आहे. यंदा हीच परंपरा कायम राखत या मंडळाने ‘इस्रो’चे ‘स्पेस स्टेशन’ व त्यातून आकाशात ३० फुटांपर्यंत झेपावणारा ‘उपग्रह’ याची प्रतिकृती साकारण्यास सुरुवात केली आहे.तेहतीस वर्षांपूर्वी बाल मंडळ म्हणून स्थापन झालेल्या या मंडळाने गेल्या दहा वर्षांपासून सहजरीत्या ने-आण करण्यास सोप्या जाव्यात, या उद्देशाने साडेपाच फूट उंचीच्या गणेशमूर्ती स्थापन करण्यास सुरुवात केली. त्यातून पर्यावरणाचा समतोल व सामाजिक बांधीलकीची जाणीव या मंडळाच्या कार्यकर्त्यांना झाली.

त्यातून तांत्रिक बाबींवर आधारित ‘शेतकरी राजा गणेश’, कारगिलमधील सैनिकांना समर्पित सैनिक रूपातील गणेशमूर्ती, पर्यावरणपूरक वृक्षातील गणेश, सर्व शिक्षा अभियानातील गणेश, ‘सेव्ह द टायगर, सेव्ह द जंगल’ पारंपरिक ढोल-ताशा वाजविणारा गणेशमूर्ती साकारल्या. तलावात होणारे प्रदूषण रोखण्यासाठी मंडळाने गेल्या वर्षीपासून फायबर, गवत, कापड, लोखंड यांपासून इको-फ्रेंडली गणेशमूर्ती साकारली.

मागील वर्षी भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’चा तांत्रिक देखावाही सादर केला होता. हीच परंपरा कायम राखत मंडळाने यंदा ‘इस्रो’च्या श्रीहरिकोटा येथील उपग्रह सोडणाऱ्या स्पेस स्टेशनची प्रतिकृती साकारण्यास प्रारंभ केला आहे. या देखाव्यासाठी मंडळाचे अध्यक्ष सागर जाधव, प्रशांत जाधव, नीलेश देसाई, प्रतापसिंह देसाई, रवींद्र सुतार, शंतनू जाधव हे परिश्रम करीत आहेत.

वैज्ञानिक खुद्द गणराययात मंडळाने दोन फूट रुंद व ११ फूट उंच असा ३० फुटांपर्यंत आकाशात झेपावणारा उपग्रह आणि भारतीय सैन्यदलासाठी या अवकाशयान केंद्राचा होणारा उपयोग याबद्दलचा हा देखावा उभारण्यात येणार आहे. या केंद्राचे नियंत्रण करणारे वैज्ञानिक खुद्द गणराय असून, त्यांना मदतनीस म्हणून काम करणारा मूषक असे या देखाव्याचे स्वरूप आहे.

विकसित देशांकडे मार्गस्थ असलेल्या आपल्या देशात श्रीहरिकोटा येथील ‘इस्रो’चे अवकाश यान केंद्र हे भारताबरोबरच नेपाळ, श्रीलंका, भूतान अशा शेजारील देशांसाठीही बहूपयोगी ठरत आहे. यासह भारतीय सैन्यदलासही हे केंद्र वरदान ठरत आहे. म्हणून आम्ही यंदा हा देखावा साकारत आहोत.- सागर जाधव,अध्यक्ष, जय शिवराय मित्र मंडळ

 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवkolhapurकोल्हापूर