शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
4
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
5
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
6
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
7
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
8
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
10
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
11
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
12
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
14
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
15
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
16
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
17
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
18
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
19
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
20
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार

जय स्वच्छता, जय श्रमदान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 1:06 AM

भारत पाटील आज आपण सर्वजण २१व्या शतकातील मशीनच्या युगात जगत आहे. फक्त बटण दाबले की, चुटकीसरशी अनेक कामे होत ...

भारत पाटीलआज आपण सर्वजण २१व्या शतकातील मशीनच्या युगात जगत आहे. फक्त बटण दाबले की, चुटकीसरशी अनेक कामे होत आहेत. संगणक युगामुळे बौद्धिक कामाला फारच महत्त्व दिले जात आहे; परंतु बौद्धिक कामाबरोबरच शारीरिक श्रमसुद्धा महत्त्वाचे आहेत. अंग मेहनतीच्या कष्टाच्या श्रमाला थोडं कमी समजलं जातंय हे मानवाचा विकास व आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक आहे. सर्वजण जर फक्त बौद्धिक श्रम करू लागले तर अंग मेहनतीशिवाय शेती पिकत नाही. दूध, शेळीपालन, पशुपालन, मत्स्य व्यवसाय, हमाली, बांधकाम, मजुरी, ग्रामसफाई अशी अनेक कामं आहेत की, ज्यात कोणी तरी श्रम करतं, घाम गाळत असतं. म्हणून तर ज्या मानवाच्या प्राथमिक व अत्यावश्यक गरजा आहेत, त्या श्रमातूनच भागवल्या जात आहेत आणि म्हणूनच कोणतेही काम कमी महत्त्वाचे नसते. गौतम बुद्ध यांना आळस हा माणसाचा शत्रू आहे असे वाटत होते. महात्मा गांधी, विनोबा भावे व साने गुरुजी यांसारख्या मानवतेच्या सेवकांना कोणतेही काम हलकं नाही, कमी महत्त्वाचे नाही हे त्यांनी स्वत: कष्टाची कामं करून सर्व जनतेला श्रम संस्काराचा आदर्श घालून दिला. संत गाडगेबाबा तर दिवसभर ग्रामसफाई करत व रात्री कीर्तनाद्वारे माणसांची मनं साफ करण्याचा प्रयत्न करत असत. श्रम करूया..एक होऊया..आपला गाव घडवूया.. स्वच्छतेमध्येच देव हाय हा विचार त्यांनी पटवून दिला. आपल्या रोजच्या जीवनात कष्टाला व श्रमाला फार महत्त्व आहे. जे लोक आॅफिस काम व बैठं, बौद्धिक काम करतात त्यांनासुद्धा आज प्रकृती उत्तम व शरीर निरोगी राहण्यासाठी व्यायाम व अंग मेहनत करावीच लागत आहे आणि म्हणूनच श्रमाचे महत्त्व ओळखून शालेय जीवनापासूनच मुलांमध्ये श्रम संस्कार व्हावेत, कष्टाची जाणीव व्हावी व श्रम प्रतिष्ठा वाढावी म्हणून ‘मुदलीयार आयोग, कोठारी आयोग व गजेंद्रगडकर यासारख्या शिक्षण आयोगांनी शालेय अभ्यासक्रमात समाजसेवा व कार्यानुभव हे विषय अंतर्भूत करून विद्यार्थ्यांच्या मनावर अंग मेहनत व श्रम संस्कार रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. आज आपला गाव व आपला देश आपल्याकडे श्रमाचे व गावासाठी अंग मेहनतीचे दान मागत आहे. श्रमदान व लोकसहभाग हा ग्रामविकासामधील महत्त्वाचा गाभा आहे. म्हणूनच माजी ग्रामविकास मंत्री स्व. आर. आर. पाटील यांनी गावांचे विकासाचे मर्म ओळखून व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या स्वच्छतेतून समृद्धी हा विचाराचा धागा पकडत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान हा एक खेड्यांना नवसंजीवनी देणारा उपक्रम हाती घेतला. आपला गाव...आपला विकास या संकल्पनेत सर्व ग्रामस्थांनी लोकसहभाग व श्रमातून गाव स्वच्छ करायचे, हागणदारीमुक्त, उकिरडा मुक्त करायचे. लोकसहभाग, लोकवर्गणी व श्रमदान यातून स्वच्छ होणाऱ्या गावांना भव्य बक्षीस योजना व गावांचा सन्मान अशी भव्य राज्यव्यापी स्पर्धा आर. आर. पाटील यांनी जाहीर केली आणि बघता बघता राज्यातील गावागावांत एक विकासाची नवक्रांती सुरू झाली. ग्रामीण भागात लोकांनी आपल्या सहभागातून व श्रमदानातून स्वच्छतेची चळवळ उभी केली. अनेक गावांनी लोकवर्गणीतून आपले गाव समृद्ध करायला सुरुवात केली. हजारो कोटी रुपयांची कामे लोकांनी स्वत: उभी करून सोनेरी अक्षरात आपला इतिहास कोरावा, असा आदर्श या चळवळीतून बघायला मिळाला. लोकसहभाग व श्रमदान याशिवाय शाश्वत विकास होऊ शकत नाही हे सत्य सर्वांना या कार्यक्रमाने पटवून दिले. केंद्र सरकारने या मानव कल्याणकारी अभियानाची दखल घेतली. जागतिक बँक व युनिसेफ यांनीपण आबांच्या या स्तुत्य उपक्रमाची दखल घेतली. पुढे त्यांनीही खूप आर्थिक मदत केली. यातील काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे : १) ग्रामसभा सक्षम होऊ लागली. २) गावात प्रथमच गावच्या विकासासाठी गट-तट विसरून लोक एकत्र येऊ लागले. ३) लोकवर्गणी, लोकसहभाग, श्रमदान या गोष्टींना पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त झाले. ४) महिला शक्ती खेड्यात प्रथमच गावच्या विकासात सामील झाली.५) स्वच्छता, पाणी, पर्यावरण, आरोग्य व समृद्ध शाळा ही पंचसूत्री ग्रामविकासमधील गुरुकिल्ली ठरली. ६) हागणदारी मुक्त गाव, उकिरडामुक्त गाव, कचरामुक्त गाव, घनकचरा व्यवस्थापन अशा संकल्पना समोर आल्या. याबरोबरच निर्मलग्राम अभियान, स्वजलधारा, जलस्वराज्य, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम व स्वच्छ भारत मिशनसारखे अनेक उपक्रम या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातून जन्माला आले. आपापल्या परीने स्वत: वर्गणी व श्रमाचे दान गावासाठी करू लागला. ग्रामसफाई होऊ लागली. गटारी, उकिरडे साफ झाले. घाणीचे ढीग गायब झाले. लोकसहभागाशिवाय गाव घडत नाहीत हे सर्वांना आता बºयापैकी कळून आले आहे. यातूनच जशी केंद्रात लोकसभा, राज्यात विधानसभा, तर गावात ग्रामसभा हे विकासातील सूत्र बनले.(लेखक ग्रामविकास व व्यसनमुक्ती चळवळीतील बिनीचे कार्यकर्ते आहेत.)