शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘जय भवानी जय शिवाजी’चा गजर अखंड गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 12:15 IST

कोल्हापूर : ‘छत्रपती शिवाजी महाराज की ऽऽ जय ’ ‘हर हर ऽऽ महादेव...’, ‘जय भवानी जय शिवाजी’चा गजर, धनगरी ...

ठळक मुद्दे शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूकसंयुक्त जुना बुधवार पेठ तालीम संस्थेच्या वतीने सजीव देखावे

कोल्हापूर : ‘छत्रपती शिवाजी महाराज की ऽऽ जय ’ ‘हर हर ऽऽ महादेव...’, ‘जय भवानी जय शिवाजी’चा गजर, धनगरी ढोल, लेझीम, झांजपथक, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, पंचगंगा प्रदूषणमुक्ती, लेक वाचवा, छत्रपती शिवाजी महाराजांसह बालशिवाजीचे सजीव देखावे अशा उत्साही वातावरणात शिवजयंतीनिमित्त मंगळवारी संयुक्त जुना बुधवार पेठ तालीम संस्थेच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली.जुना बुधवार पेठ येथे या मिरवणुकीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महापौर सरिता मोरे, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सतेज पाटील, शिवसेना सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजप महानगर अध्यक्ष संदीप देसाई, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, धनंजय सावंत यांच्यासह संयुक्त जुना बुधवार पेठेचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून या भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीच्या सुरुवातीला आकर्षक लेसर लाईट होते. त्यापाठोपाठ आर्यन ढोलपथक होते. पाठोपाठ रिक्षांवर पंचगंगा प्रदूषण, भूकबळी, राजर्षी शाहूराजा तुजला हा मुजरा, बळिराजा, पाणी वाचवा, लेक वाचवा, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी ताराराणी यांच्याबद्दल सचित्र व प्रबोधनात्मक फलक लावण्यात आले होते. त्यानंतर बाल शिवाजी यांची वेशभूषा परिधान करून बालचमू ट्रॉलीत बसले होते.

सुप्रभात ब्रॅँड, त्यापाठोपाठ मर्दानी खेळांचे चित्तथरारक प्रात्यक्षिक दाखविण्यात येत होते. तसेच कागल, माद्याळ येथील श्रीराम मंडळाचे लेझीम पथक व हणमंतवाडी येथील श्री बिरदेव तरुण मंडळाच्या ढोलपथकाने मिरवणुकीत उत्साहाचे रंग भरले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा परिधान करून युवक घोड्यावर आरूढ झाले होते. सगळ्यांत शेवटी सिंहासनारूढ छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा होता.भगवे फेटे, पांढऱ्या रंगाचे झब्बे अशी पारंपरिक वेशभूषा केलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले. ही मिरवणूक महानगरपालिका, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटीमार्गे जुना बुधवार पेठ येथे सांगता झाली. ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

महिलांचा उत्स्फूर्त सहभागया मिरवणुकीत मुलींचे मर्दानी खेळ, लेझीम पथकांचा समावेश होता. याशिवाय मिरवणुकीत महिला पारंपरिक वेशभूषा करून सहभागी झाल्या होत्या.

 

 

 

टॅग्स :Shivjayantiशिवजयंतीkolhapurकोल्हापूर