जनसंपर्क विभागातील जाधव यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:25 IST2021-04-01T04:25:55+5:302021-04-01T04:25:55+5:30

कोल्हापूर : महापालिकेच्या जनसंपर्क विभागातील कनिष्ठ लिपिक राजेंद्र तानाजी जाधव यांचा सेवानिवृत्तीनिमित्त बुधवारी पत्रकार कक्षात उपायुक्त शिल्पा दरेकर, महापालिका ...

Jadhav felicitated on the occasion of his retirement | जनसंपर्क विभागातील जाधव यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

जनसंपर्क विभागातील जाधव यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

कोल्हापूर : महापालिकेच्या जनसंपर्क विभागातील कनिष्ठ लिपिक राजेंद्र तानाजी जाधव यांचा सेवानिवृत्तीनिमित्त बुधवारी पत्रकार कक्षात उपायुक्त शिल्पा दरेकर, महापालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सत्कार करण्यात आला.

लिपिक राजेंद्र जाधव यांनी ३८ वर्षे महापालिकेत सेवा केली. सध्या ते जनसंपर्क विभागात कार्यरत होते. प्रामणिकपणे काम करणारा कर्मचारी अशी त्यांची महापालिकेत ओळख आहे. सुट्टीदिवशीही ते कामावर हजर राहत असत. मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा महापालिकेत चांगला संपर्क राहिला. यावेळी उपायुक्त शिल्पा दरेकर, महापालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले, ज्येष्ठ पत्रकार भारत चव्हाण, संजीव खाडे व जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांच्या आजवरच्या कामाचा अनुभव त्यांनी व्यक्त केला. महिला व बालकल्याणच्या अधीक्षक प्रीती घाटोळे यांनी आभार मानले.

Web Title: Jadhav felicitated on the occasion of his retirement