शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

वारणा मॅरेथॉन स्पर्धेत जाधव अजिंक्य : स्पर्धकांचा मोठा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 00:33 IST

वारणा उद्योग व शिक्षण समूहाच्यावतीने वारणा बझार व तात्यासाहेब कोरे क्रीडा प्रबोधिनी यांच्या सहकार्यातून आमदार डॉ. विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वारणा मॅरेथॉन स्पर्धा घेण्यातआली. सकाळी स्पर्धेचे उद्घाटन वारणा बझारचे उपाध्यक्ष सुभाष देसाई, सरव्यवस्थापक शरदमहाजन यांच्या हस्ते व संचालक विश्वनाथ पाटील, अनिल पाटील, मोहन राजमाने, आदींच्या उपस्थितीत झाले.

ठळक मुद्देसंजय झाकणे, खुशबू खान, पंकज मरोटे विविध गटांत विजयी

वारणानगर : सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या २५ व्या पुण्यस्मरणार्थ आयोजित केलेल्या वारणा मॅरेथॉन स्पर्धेत २१ किलोमीटर पुरुष खुल्या गटामध्ये सातवे (ता. पन्हाळा) येथील सातवे स्पोर्टस् बॉईजच्या प्रताप राजेश जाधव याने प्रथम, तर १० किलोमीटर पुरुष खुल्या गटात वारणा महाविद्यालयाच्या संजय मारुती झाकणे याने व ५ किलोमीटर महिलांच्या खुल्या गटात वारणेच्याच खुशबू राजू खान यांनी प्रथम क्रमांक मिळवून ही मॅरेथॉन स्पर्धा जिंकली. पुरुष महाविद्यालयीन गटात ५ कि. मी.मध्ये पंकज माणिकराव मरोटे (क्रीडा प्रबोधिनी पुणे) याने प्रथम क्रमांक पटकावला.

वारणा उद्योग व शिक्षण समूहाच्यावतीने वारणा बझार व तात्यासाहेब कोरे क्रीडा प्रबोधिनी यांच्या सहकार्यातून आमदार डॉ. विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वारणा मॅरेथॉन स्पर्धा घेण्यातआली. सकाळी स्पर्धेचे उद्घाटन वारणा बझारचे उपाध्यक्ष सुभाष देसाई, सरव्यवस्थापक शरदमहाजन यांच्या हस्ते व संचालक विश्वनाथ पाटील, अनिल पाटील, मोहन राजमाने, आदींच्या उपस्थितीत झाले.दुपारी विजेत्या स्पर्धकांना कोडोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे व वारणा कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. आर. भगत यांच्याहस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रोख रक्कम व तात्यासाहेब कोरे स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये ५ कि. मी.च्या पुरुष खुल्या गटात बंडू माने (वय ८०, रा. ठमकेवाडी), गोरखनाथ केकरे (७०, रा. कोडोली), ज्योतिराम मानकर (५७, रा. कोडोली), अशोक शंकर पाटील (५०) यांनी सहभाग घेऊन स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल चौघांचा विशेष सत्कार करण्यात आला.

प्रारंभी वारणा महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य डॉ. के. जी. जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. क्रीडा प्रशिक्षक प्रा. विशाल चव्हाण, के. एस. तिरुज्ञानसंपदम, दीपक चव्हाण, दीपक कुंभार, संभाजी पाटील, बझारचे अधिकारी दिलीप पाटील, शिवाजी पाटील, संदीप पाटील, महेश आवटी, तानाजी ढेरे, हणमंत दाभाडे, प्रदीप शेटे, रघुनाथ मलगुंडे, सर्जेराव पाटील, संग्राम दळवी, युवराज जाधव, उदय पाटील, संजय जाधव व इतर क्रीडाप्रेमी, कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. बझारचे संचालक विश्वनाथ पाटील यांनी आभार मानले. राजेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

वारणानगर येथे आयोजित केलेल्या वारणा मॅरेथॉन स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना कोडोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे व कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. आर. भगत यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी बझारचे सरव्यस्थापक शरद महाजन, उपाध्यक्ष सुभाष देसाई, भाऊसाहेब मलगुंडे, डॉ. के. जी. जाधव, सिद्धार्थ हिरवे, विश्वनाथ पाटील, मोहन आजमने, आदी मान्यवर उपस्थित होते.

 

टॅग्स :Marathonमॅरेथॉनkolhapurकोल्हापूर