‘आयटीआय’च्या अर्जनिश्चितीचा वेग वाढला

By Admin | Updated: July 1, 2016 00:18 IST2016-07-01T00:10:50+5:302016-07-01T00:18:05+5:30

अकरावीची गुणवत्ता यादी आज प्रसिद्ध : उद्यापासून प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही --मिशन अ‍ॅडमिशन

'ITI's earning speed increased | ‘आयटीआय’च्या अर्जनिश्चितीचा वेग वाढला

‘आयटीआय’च्या अर्जनिश्चितीचा वेग वाढला

कोल्हापूर : अकरावी प्र्रवेश प्रक्रियेअंतर्गत संकलित झालेल्या अर्जांची छाननी व गुणवत्ता यादी बनविण्याची प्रक्रिया पूर्ण झालआहे. आज, शुक्रवारी दुपारी तीन वाजता गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. उद्या, शनिवारपासून प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही सुरू होईल. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) अर्जनिश्चितीचा वेग वाढला आहे.
शहरातील ३२ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडे एकूण १३४०० जागांसाठी १३८६० अर्ज दाखल झाले आहेत. समितीकडे दाखल झालेल्या अर्जांची छाननी आणि गुणवत्ता यादी तयार करण्याची प्रक्रिया गुरुवारी पूर्ण झाली. या यादीची प्रसिद्धी आज, शुक्रवारी दुपारी तीन वाजता शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या ६६६.८िीि‘ङ्मस्र.ङ्म१ॅ या संकेतस्थळासह सर्व महाविद्यालयांमध्ये प्रसिद्धी केली जाणार आहे. गुणवत्ता यादीनुसार उद्या, शनिवारपासून गुरुवार (दि. ७ जुलै)पर्यंत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश देण्याची कार्यवाही होईल. यातील रिक्त जागांवर महाविद्यालयीन पातळीवर विद्यार्थ्यांना ८ आणि ९ जुलैला प्रवेश दिला जाईल. महाविद्यालयांतील अकरावीचे वर्ग ११ जुलैपासून सुरू होतील. दरम्यान, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचा सर्व्हर योग्यपणे व क्षमतेने कार्यरत झाल्याने कोल्हापुरातील ‘आयटीआय’कडील अर्जनिश्चितीचा वेग वाढला आहे. गुरुवारी ४०७ अर्ज निश्चित झाले.

‘अ‍ॅप’वर समजणार महाविद्यालय
गुणवता यादीची माहिती प्रवेश प्रक्रिया समितीद्वारे ‘ङ्म’ँंस्र४१ 11३ँ अे्रि२२्रङ्मल्ल या मोबाईल अ‍ॅपवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी अ‍ॅपवर गुणवत्ता यादीच्या पर्यायामध्ये अर्जाचा क्रमांक नमूद केल्यानंतर त्याला प्रवेशासाठी मिळालेल्या महाविद्यालयाचे नाव समजणार असल्याचे प्रवेश प्रक्रिया समितीचे कार्याध्यक्ष डॉ. वसंत हेळवी यांनी सांगितले.

तंत्रनिकेतनसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली
शासकीय आणि खासगी तंत्रनिकेतनमधील प्रथम वर्ष पदविकेच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत तंत्रशिक्षण संचालनालयाने वाढविली असून, सोमवारपर्यंत (दि. ४) अर्ज करता येणार आहेत. शासकीय तंत्रनिकेतनमधील सुविधा केंद्रातून गुरुवारअखेर प्रथम वर्ष पदविकांसाठी खुल्या व आरक्षित प्रवर्गातील ९७० अर्जांची, तर थेट द्वितीय वर्षासाठी २९४ अर्जांची विक्री झाली आहे. थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची मुदत उद्या, शनिवारपर्यंत आहे.

Web Title: 'ITI's earning speed increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.