महिलांनीच ‘चूल आणि मूल’ प्रथा मोडीत काढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:19 IST2021-01-08T05:19:06+5:302021-01-08T05:19:06+5:30

गडहिंग्लज : देशातील समाजकारण, राजकारण असो किंवा शैक्षणिक आणि वैज्ञानिक क्षेत्र असो. सर्वच क्षेत्रांत महिलांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे ...

It was women who broke the tradition of 'chool and mool' | महिलांनीच ‘चूल आणि मूल’ प्रथा मोडीत काढली

महिलांनीच ‘चूल आणि मूल’ प्रथा मोडीत काढली

गडहिंग्लज : देशातील समाजकारण, राजकारण असो किंवा शैक्षणिक आणि वैज्ञानिक क्षेत्र असो. सर्वच क्षेत्रांत महिलांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय महिलांनी विविध क्षेत्रांत आपला वरचष्मा राखून ‘चूल आणि मूल’ ही प्रथा मोडीत काढली आहे, असे प्रतिपादन सातारा येथील मल्लिका पाटणकर यांनी केले.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातर्फे आयोजित ‘स्त्री सबलीकरण आणि भावनिक सक्षमता’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण होते.

पाटणकर म्हणाल्या, भारतीय महिला जशा भावनिक, सहनशील असतात तशाच त्या त्यागी वृत्तीच्या व कार्यक्षमही आहेत. या गुणांमुळेच त्या अनेक क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करताना दिसत आहेत.

यावेळी संस्थाध्यक्ष राजन पेडणेकर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन झाले. डॉ. गंगासागर चोले यांनी प्रास्ताविक केले. धर्मवीर क्षीरसागर, समीर कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. स्वयंप्रभा सरमगदूम यांनी आभार मानले.

Web Title: It was women who broke the tradition of 'chool and mool'