शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

बापानेच मुलांना सोडले..कोल्हापूर पोलिस माणुसकीला जागले; जिंतूरची मुले आजी-आजोबांकडे सुखरूप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 11:34 IST

मुले भुकेने व्याकुळ होऊन बसली होती. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी त्यांना पोटभर खाऊ घालत मायेची फुंकर घातली

कोल्हापूर : खुद्द बापानेच पुण्यातून रेल्वेने कोल्हापुरात आणून सोडलेली मुले भुकेने व्याकुळ होऊन लक्ष्मीपुरीतील एका मोबाइल दुकानाच्या पायऱ्यांवर बसली होती. बराच वेळ बसलेल्या या मुलांची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी त्यांना पोटभर खाऊ घालत मायेची फुंकर घातली. त्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिसांनी नातेवाइकांचा शोध घेत त्यांना जिंतूर (जि. परभणी) येथील आजी-आजोबांच्या स्वाधीन करीत आपले कर्तव्य बजावले. समाजाच्या टीकेचे नेहमीच धनी होणाऱ्या पोलिस बांधवांनी आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडवले.घडले ते असे : लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (दि. ८) सकाळी एका मोबाइल दुकानाच्या पायऱ्यांवर एक सहा वर्षांचा, एक आठ वर्षांचा आणि १० वर्षांचा असे तिघे भाऊ भुकेने व्याकुळ होऊन बसले होते. याबाबतची माहिती लक्ष्मीपुरी ठाण्याचे पोलिस कर्मचारी मुरलीधर रेडेकर यांना कळली. त्यांनी आणखी एका सहकाऱ्यास सोबत घेत त्या ठिकाणी धाव घेतली. त्यांनी मायेने विचारपूस करीत त्या तिघा बालकांना पोलिस ठाण्यात आणले. त्यांना व्यवस्थित खाऊपिऊ घातल्यानंतर त्यांच्याकडे मायेने विचारपूस केली. मात्र, त्यांच्याकडे मोबाइल अथवा संपर्क नंबर नव्हता. चौकशीत खुद्द वडिलांनीच पुण्यातून येथे कोल्हापुरात झोपेत असतानाच सोडल्याचे पुढे आले. आपली नावे सांगितली व पत्ता रा. अण्णा भाऊ साठेनगर जिंतूर (परभणी) असा सांगितला. ही बाब पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांच्या कानांवर घालण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार मुलांच्या नातेवाइकांच्या शोधासाठी जिंतूर पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. त्यांच्याकडून माहिती मिळाली. मुलांची काळजी व संरक्षणाकरिता बालगृहात त्यांची व्यवस्था करण्यात आली. दुसऱ्या दिवशी या मुलांचे आजी-आजोबा कोल्हापुरात आले. मुलेही आजी-आजोबांना ओळखून त्यांच्याजवळ गेली. पोलिसांनी कागदपत्रांची पूर्तता करीत मुलांना आजी-आजोबांकडे सुपुर्द केले. विशेष म्हणजे मुले व आजी-आजोबांचे तिकीट काढून पोलिसांनीच त्यांना शुक्रवारी दुपारी जिंतूरला एस.टी. बसने पाठवून दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस