शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रक्तघटकांचे सेवाशुल्काचे फलक हॉस्पिटलमध्ये लावणे बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 11:58 IST

त्येक हॉस्पिटलमध्ये रक्त व रक्तघटकांचे सेवाशुल्काचे फलक लावणे, कोल्हापूर जिल्हा रक्तपेढी असोसिएशनने बंधनकारक केल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश घुंगूरकर, उपाध्यक्ष सतीश मेटे, सचिव सागर माळी व खजानिस सयाजी फराकटे यांनी पत्रकातून दिली.

ठळक मुद्देरक्तघटकांचे सेवाशुल्काचे फलक हॉस्पिटलमध्ये लावणे बंधनकारकरक्तपेढी असोसिएशनचा निर्णय : रुग्णांच्या जीवाशी खेळणारे ब्लॅक लिस्टमध्ये

कोल्हापूर : प्रत्येक हॉस्पिटलमध्ये रक्त व रक्तघटकांचे सेवाशुल्काचे फलक लावणे, कोल्हापूर जिल्हा रक्तपेढी असोसिएशनने बंधनकारक केल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश घुंगूरकर, उपाध्यक्ष सतीश मेटे, सचिव सागर माळी व खजानिस सयाजी फराकटे यांनी पत्रकातून दिली. रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या हॉस्पिटलना ब्लॅकलिस्टमध्ये टाकू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.कोल्हापूर जिल्ह्यात रक्तदात्यांचा टक्का वाढत असला, तरी व्यावसायिक रक्तदाते पुढे येत आहेत. कर्नाटकातील रक्तपेढ्या दात्यांना हेल्मेट, बुट, पेनड्राईव्ह, ट्रॅव्हल बॅग यासारख्या महागड्या वस्तूंचे आमिष दाखवले जाते, ही बाब निश्चितच चिंताजनक असून, कर्नाटकातील रक्तपेढ्यांनी सांगली, सोलापूर या परिसरात रक्तसंकलनासाठी काही एजंट नियुक्त केले आहेत. महाराष्ट्रातील काही रक्तपेढ्याही यामध्ये सहभागी दिसतात.असोसिएशनने रक्तदात्यांसाठी, हॉस्पिटल व रक्तपेढीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी समान धोरण ठरले आहे. यामध्ये रक्तपेढ्यातील रक्त व रक्त घटकांचे सेवाशुल्क, रक्तदाता कार्डची सुविधा, व्यावसायिक रक्तदाते नाकारणे, रक्तातील कमिशन मागणाऱ्या हॉस्पिटलची ब्लॅकलिस्ट तयार करून त्यांना रक्तपुरवठा न करणे, रक्तपेढी कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण देणे याचा समावेश आहे.रक्त घटकांच्या सेवाशुल्कांचे फलक हॉस्पिटलमध्ये लावणे बंधनकारक केले आहे. जेणेकरून रुग्णांच्या नातेवाईकांना सेवाशुल्क कळले पाहिजे, यातून होणारी लूट थांबावी व या व्यवसायातील चुकीच्या पद्धतींना चाप लावण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे अध्यक्ष प्रकाश घुंगूरकर व उपाध्यक्ष सतीश मेटे यांनी पत्रकात म्हटले आहे.

कमिशन एजंटाचा सुळसुळाटरक्त पुरवठ्यामध्ये कमिशन मिळावे, यासाठी बहुतांशी हॉस्पिटलमध्ये पीआरओ, अ‍ॅडमीनपासून ते ओ. टी. असिस्टंट, सहायक वैद्यकीय अधिकार ते मुख्य डॉक्टरापर्यंत साखळी आहे. ही साखळी रक्तपेढ्यांना वेठीस धरत आहे. काहीजण रक्तपेढ्यांकडे रक्त व रक्तघटकांच्या सेवा शुल्काबाबत कोटेशन मागणी करत असून हे भयानक असल्याचे पत्रकात म्हटले आहे. 

 

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीkolhapurकोल्हापूर