शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Kolhapur: पर्यटन महामंडळाने गाशा गुंडाळला, पन्हाळगडावरील हॉटेल, रेस्ट हाऊसची दुरवस्था 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 16:47 IST

देणी थकल्याने कारभार ठप्प

नितीन भगवानपन्हाळा : महाराष्ट्र पर्यटन महामंडळ सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना पन्हाळगडावर ३० वर्षांची देणी थकल्याने महामंडळाच्या हॉटेल, खोल्या जैसे थे अवस्थेत टाकून गाशा गुंडाळावा लागला आहे. सध्या या जागांची दुरवस्था झाली असून, तेथे अवैध प्रकार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याप्रकरणी लक्ष घालत पुन्हा पर्यटकांसाठी महामंडळाच्या सोयी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.पन्हाळगडावर पर्यटकांचा ओघ वाढत असल्याने शासनाने पर्यटन महामंडळाला गडावर तीन जागा भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. याठिकाणी पर्यटन महामंडळाने पर्यटकांच्या सोयी-सुविधांसाठी नगर परिषद कार्यालयाच्या पाठीमागील बाजूला सि. स. नंबर १/६४ सुमारे एक एकर जागेवर आठ खोल्या बांधल्या. ही प्रशस्त अशी मध्यवस्तीत जागा आहे तर दुसरी जागा सज्जा कोठीजवळ असून, याठिकाणी दोन खोल्या बांधल्या आहेत. तिसरी जागा बाजीप्रभू पुतळ्यापासून धान्य कोठाराकडे जाताना डाव्या बाजूला सि. स. नंबर ६३४ मध्ये सुमारे साडेतीन एकर जागेत पर्यटकांना राहण्यासाठी दहा खोल्या, हाॅल, हाॅटेल असे बांधकाम केले आहे.           पन्हाळा येथे पर्यटन महामंडळातर्फे सन १९५८ मध्ये या निवासी खोल्यांचे बांधकाम केले. हे सर्व महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने १९८० पर्यंत व्यवस्थित चालवले. मात्र, याची देखभाल-दुरुस्ती करायला जमत नसल्याने तीनही ठिकाणच्या जागा महामंडळाने ३० वर्षे कराराने खासगी कंत्राटदाराला चालविण्यास दिल्या. कंत्राटदाराने मंडळाचे भाडे व नगर परिषदेकडील वाणिज्य घरफाळा भरला नाही. कराराचा भंग झाल्याने मंडळाने जागा आपल्या ताब्यात घेतली. पण नगर परिषदेकडील कर भरला नसल्याने प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आणि सर्वच कारभार ठप्प झाला. चुकीच्या पद्धतीने खासगीकरण झाल्याने येथील पर्यटकांचा राबता मोडीत निघाला.महामंडळाच्या सर्वच खोल्या आता ओस पडल्या असून, गैरकामाचे अड्डे झाले आहेत. पन्हाळगडावरील पोलिस याठिकाणी येत नसल्याने हा परिसर धोकादायक बनला आहे.पर्यटन महामंडळाचे कार्यालय पुण्यात गेले असून, सध्या कोल्हापूर विभागाच्या मुख्याधिकारी मौसमी कोसे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, महामंडळाला पन्हाळगडावर मिळालेल्या जागा भाडेतत्वावरील असल्याने याठिकाणी महामंडळाला निधी शासनाकडून उपलब्ध होत नाही. त्यामुळे याठिकाणी महामंडळ काहीही करू शकत नाही.

नगर परिषदेचा घरफाळा व अन्य देणे सुमारे २० लाख रुपये थकले आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने करार संपुष्टात आला तरीही बेकायदेशीरपणे महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या जागेत वीज, पाण्यासह धान्य कोठाराजवळील जागेत खासगी हाॅटेल अस्तित्वात आहे. त्याला पायबंद घालू शकत नाही. - चेतनकुमार माळी, मुख्याधिकारी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtourismपर्यटन