शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मतभेद विसरुन एकत्र येणे कधीही चांगलेच, शरद पवार यांचे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 11:33 IST

'राज ठाकरेंची भाषा बरोबर नाही'

कोल्हापूर : राजकारणात मतभेद विसरुन एकत्र येऊन चांगले काम करणे कधीही चांगलेच. त्यामुळे सगळे मतभेद विसरुन आम्ही एकत्र येत असू तर ते चांगलेच आहे, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी कोल्हापुरात दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर भाष्य केले. सगळे मतभेद विसरून चांगले काम केले तर वाईट वाटायचे कारण नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.दोन दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का ? या प्रश्नावर पवार यांनी एकत्र येणे चांगलेच असल्याचे सांगितले. पवार म्हणाले, मनसे व उद्धवसेना एकत्र आले तर चांगलेच आहे. दोन भाऊ मतभेद विसरुन एकत्र येणे चांगलेच असते. पण, ते एकत्र येतील की नाही हे सांगायला मी ज्योतिषी नाही. जनसुरक्षा कायद्यामुळे सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. या कायद्यात दुरुस्ती करण्याच्या विचार सुरु असून याला आमचा पाठिंबा असल्याचेही पवार म्हणाले.राज यांची भाषा बरोबर नाहीपहिली ते चौथीपर्यंत हिंदी भाषा लादणे योग्य नाही, पण भारतात ५० टक्के नागरिक हिंदीत बोलतात. त्यामुळे हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नसल्याचे पवार म्हणाले. हिंदीला विरोध करण्यासाठी निघणाऱ्या मोर्चात कोण कोण येत नाही हे पाहतोच ही राज ठाकरे यांची भाषा बरोबर नाही. तुम्ही सहभागी व्हा म्हटल्यावर सहभागी होता येत नाही. भूमिका समजावून घ्यावी लागेल. महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय असेल तर भूमिका घेतली जाईल, याकडेही पवार यांनी लक्ष वेधले.