शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्ती पुनर्प्रतिष्ठापनेला ३०९ वर्षे पूर्ण

By संदीप आडनाईक | Updated: September 28, 2024 15:53 IST

संदीप आडनाईक कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात विराजमान असलेल्या मूर्तीच्या पुनर्प्रतिष्ठापनेला गुरुवारी ३०९ वर्षे पूर्ण झाली. तीन ...

संदीप आडनाईककोल्हापूर: करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात विराजमान असलेल्या मूर्तीच्या पुनर्प्रतिष्ठापनेला गुरुवारी ३०९ वर्षे पूर्ण झाली. तीन शतकांपूर्वी झालेल्या परकीय आक्रमण काळात मूर्तीचे संरक्षण व्हावे यासाठी तत्कालीन श्रीपूजकांपैकी एकाने ही मूर्ती एका घरात लपवून ठेवली होती. नंतर करवीर संस्थानाची स्थापना झाल्यानंतर या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यामुळे हा दिवस कोल्हापूरसाठी ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो.लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी देशातून लाखो भाविक येत असतात. या मंदिराला मोठा इतिहास आहे. मंदिरात गाभाऱ्यात विराजमान झालेल्या श्री अंबाबाईचा मूर्तीचा इतिहासही वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेला गुरुवारी ३०९ वर्षे पूर्ण झाली, अशी माहिती मूर्ती अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी दिली.आदिलशाहीत मोगलांनी मंदिरांचा विध्वंस केला, तेव्हा देवीची मूर्ती सुरक्षित राहावी म्हणून ग्रामदैवत असलेल्या कपिलेश्वर मंदिरामागे राहणाऱ्या तत्कालीन श्रीपूजकांनी ती स्वतःच्या घरी लपवून ठेवली, तशी नोंद करवीर माहात्म्यात आहे. १७१० मध्ये करवीर संस्थानाची स्थापना झाली. त्यानंतर संभाजी महाराज दुसरे यांच्या कारकिर्दीत १७१५ ते १७२२ या कालखंडात या मंदिराचे पुनरुज्जीवन झाले.वेदशास्त्रसंपन्न नरहर भट प्रधान (सावगावकर) यांनी पन्हाळगडावर जाऊन संभाजी महाराज छत्रपतींना अंबाबाईच्या मूर्तीविषयी आणि त्यांना मिळालेल्या दृष्टांताची माहिती दिली. त्यांनी सिदोजीराजे गजेंद्रगडकर घोरपडे यांना आज्ञा दिल्यानंतर मन्मथ नाम संवत्सर इंदूवासर (सोमवार) विजयादशमी (दसरा) म्हणजे २६ सप्टेंबर १७१५ या दिवशी अंबाबाईच्या मूर्तीची पुनर्प्राणप्रतिष्ठापना केली.

सध्या नित्यपूजेमधील श्री अंबाबाई मूर्तीचे वर्णन सर जोशीराव यांच्या गारेचा गणपती मंदिरातील खांबावरील १२ व्या शतकातील शिलालेखात आहे. मूर्तीच्या हातात म्हाळुंग, गदा, ढाल, पानपात्र असून, मूर्ती अडीच फुटांची आहे. मस्तकावर संयोनी लिंग आहे. कोल्हापूरच्या दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. -उमाकांत राणिंगा, मूर्ती अभ्यासक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर