जातपंचायतीच्या संघर्षातून घडलो : अशोक जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:28 IST2021-08-21T04:28:26+5:302021-08-21T04:28:26+5:30
‘भंगार’ आत्मचरित्राच्या सातव्या आवृत्ती प्रकाशनाबद्दल त्यांचा एव्हरग्रीन गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सत्कार एम. एस. बोरगावे यांच्या हस्ते करण्यात ...

जातपंचायतीच्या संघर्षातून घडलो : अशोक जाधव
‘भंगार’ आत्मचरित्राच्या सातव्या आवृत्ती प्रकाशनाबद्दल त्यांचा एव्हरग्रीन गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सत्कार एम. एस. बोरगावे यांच्या हस्ते करण्यात आला.
जाधव म्हणाले, भंगार या साहित्यामध्ये संकटाला सामोरे जाण्याची प्रेरणा आहे. भंगार गोळा करून जीवन जगणाऱ्या बालकांचे वास्तव मांडले आहे. घरच्यांनी व समाजाने बहिष्कृत करून व अनेक अडचणीवर मात करूनही मी शिक्षण पूर्ण केले व माझी बहीण स्त्रीरोगतज्ज्ञ बनली आहे. ती समाजाबद्दल कृतज्ञता म्हणून आदिवासी भागात सवलतीच्या दरात औषधोपचार सेवा देत आहे.
भंगार आत्मचरित्र वाचून पंढरपूर येथील समाजसेवक मंगल शहा यांनी भंगार गोळा करणाऱ्या मुलांसाठी २५ एकरांमध्ये शाळा निर्माण केली आहे. नागपूरचे उद्योगपती जाखडे यांनी अशा मुलांच्या शिक्षणासाठी १ कोटी निधी संकलन सुरू केले आहे. चित्रपट निर्माते नागराज मंजुळे यांनी भेटीचे आमंत्रण दिले आहे. मुख्यमंत्र्यांचे सचिव विकास खारगे यांच्या सूचनेनुसार अशा मुलांचे सर्व्हे करण्याचे कामही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले .
स्वागत व प्रास्ताविक दिलीप सूर्यवंशी यांनी केले. याप्रसंगी आप्पासाहेब पाटील, डॉ. बी. एम. आरगे, विश्वास सांबारे, रमेश पाटील, निवृत्ती चोपडे, डॉ. अष्टेकर, ईश्वर केंगार, कृष्णात सातपुते, दशरथ भोई यांच्यासह ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
फोटो - २००८२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ : यड्राव (ता. शिरोळ) येथे ‘भंगार’कार अशोक जाधव यांचा सत्कार करताना आप्पा पाटील, राहुल जैद, मल्लाप्पा देवकते, गणपती दरीबे, राजू कांबळे यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. (छाया-घन:शाम कुंभार, यड्राव)