आमच्यामुळेच विकास कामे हा विरोधकांचा गैरसमज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:25 IST2021-03-23T04:25:54+5:302021-03-23T04:25:54+5:30
कोगनोळी : समाजाचे हित लक्षात घेऊन विकासकामे केली जातात. ती विरोधक नसतानाही करावी लागतात. मागील कालावधीमध्ये एकही विरोधी पक्षाचा ...

आमच्यामुळेच विकास कामे हा विरोधकांचा गैरसमज
कोगनोळी : समाजाचे हित लक्षात घेऊन विकासकामे केली जातात. ती विरोधक नसतानाही करावी लागतात. मागील कालावधीमध्ये एकही विरोधी पक्षाचा सदस्य नसतानाही कोगनोळी ग्रामपंचायतीने अनेक विकासकामे राबवली आहेत, असे मत ग्रामपंचायत सदस्य तात्या कागले यांनी व्यक्त केले. ते ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
कागले पुढे म्हणाले, पी अँड पी सर्कलमधील जलशुद्धीकरण केंद्र, राजीव गांधीनगर व गायकवाड गल्लीतील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, गावातील पाणंद रस्त्यांची दुरुस्ती, गटारींची स्वच्छता आदी विकासकामे सर्व सदस्यांना विश्वासात घेऊनच केली जात आहेत. मंत्री व खासदार हे विरोधी पक्षाचे आहेत. त्यांनीही गावात विकासकामे राबवावीत. त्यासाठी ग्रामपंचायतीचे संपूर्ण सहकार्य राहील. दूधगंगा नदीपासून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत नवीन पाईपलाईन घालून प्राधान्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात काढण्यात येणार आहे.
यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा आक्काताई खोत, सदस्य सुनील कागले, महेश जाधव, प्रवीण भोसले, धनंजय पाटील, परशुराम चावर, आप्पासाहेब खोत यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.