सावित्रीबाईंमुळेच आज महिला सन्मानाचे हारतुरे स्वीकारतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:18 IST2021-01-08T05:18:13+5:302021-01-08T05:18:13+5:30

कुंभोज : क्रांतिज्योती ...

It is because of Savitribai that women today accept the blessings of honor | सावित्रीबाईंमुळेच आज महिला सन्मानाचे हारतुरे स्वीकारतात

सावित्रीबाईंमुळेच आज महिला सन्मानाचे हारतुरे स्वीकारतात

कुंभोज : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील विरोध झुगारून मुलींसाठी शिक्षणाची द्वारे खुली केली. म्हणूनच आज समाजातील महिला शिक्षित व स्वावलंबी बनून सन्मानाचे हार तुरे स्वीकारत आहेत, असे प्रतिपादन सखी संपदा महिला मंचच्या अध्यक्षा स्वप्नजा घाटगे यांनी केले.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती तसेच बालिका दिनानिमित्त महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने कोल्हापूर येथील श्री पंचमुखी गणेश हाॅलमध्ये आयोजित पुरस्कार प्राप्त महिलांचा गौरव व आरोग्य तपासणी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेच्या सल्लागार मालती राजमाने होत्या.

दरम्यान, डॉ पूजा पाटील यांनी महिलांची आरोग्य तपासणी करून उपस्थित शिक्षिकांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. स्त्री-पुरूष समानता, सावित्रीबाईंचे कार्य या विषयावरील व्याख्यानाचा लाभ उपस्थितांनी घेतला. संघटनेच्यावतीने विविध पुरस्कारप्राप्त महिला शिक्षिकांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, जिल्हाध्यक्ष एस. के. पाटील, दिलीप भोई, रंगराव वाडकर, शंकर पवार, सुनील पोवार, अशोक शिवणे, दिगंबर टिपुगडे, शारदा वाडकर, प्रमिला माने, राजश्री पिंगळे, वसुधा शिंदे, सुजाता पोवार, स्मिता कारेकर, मनिषा गुरव, वृषाली पाटील, संतोषी कुंभार, राजश्री लाखे, सुनिता कोरे यांच्यासह सर्व जिल्हा तसेच तालुका महिला मंच पदाधिकारी, तालुका शाखा महिलामंच पदाधिकारी उपस्थित होते.

स्वागत महिला जिल्हा सरचिटणीस शारदा वाडकर यांनी केले, प्रास्ताविक महिला जिल्हाध्यक्षा विद्या कदम यांनी केले. अलका थोरात यांनी आभार मानले.

फोटो ओळी-

पुरोगामी शिक्षक संघटनेच्यावतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती तसेच बालिका दिनानिमित्त कोल्हापूर येथे आयोजित कार्यक्रमात स्वप्नजा घाटगे यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: It is because of Savitribai that women today accept the blessings of honor