प्रलंबित असलेल्या समस्यांची निर्गत करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:54 IST2020-12-05T04:54:44+5:302020-12-05T04:54:44+5:30

(फोटो) लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरात प्रलंबित असलेल्या समस्यांचा वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही होत नाही. मागील महिन्यात अन्नत्याग ...

Issue pending issues | प्रलंबित असलेल्या समस्यांची निर्गत करावी

प्रलंबित असलेल्या समस्यांची निर्गत करावी

(फोटो)

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहरात प्रलंबित असलेल्या समस्यांचा वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही होत नाही. मागील महिन्यात अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यावेळी नगरपालिका प्रशासनाकडून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार गुरुवारी इचलकरंजी नागरिक मंचच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्षा अलका स्वामी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

निवेदनात, गावात भटकी कुत्री व मोकाट जनावरांचे नियोजन, गावातील वाढते व फुटपाथवरील अतिक्रमणे, वृक्षसंपदा जतन व तरू समिती कारभार चौकशी, सार्वजनिक मुताऱ्यांची दुरावस्था, माहिती अधिकार दिन साजरा करणे, स्मशानभूमी पार्किंग, बेकायदेशीर वृक्षतोड, शहर वाहतूक समस्येवर लक्ष द्यावे, अशी मागणी केली. शिष्टमंडळात शीतल मगदूम, संजय डाके, अभिजित पटवा, धैर्यशील कदम, आदींचा समावेश होता.

(फोटो ओळी)

०३१२२०२०-आयसीएच-०५

इचलकरंजीतील प्रलंबित कामे पूर्ण करावीत, या मागणीचे निवेदन नागरिक मंचने नगराध्यक्षा अलका स्वामी यांना दिले.

Web Title: Issue pending issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.