चिंचेवाडीतील भूखंडधारकांचा प्रश्न मार्गी लावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:26 IST2021-09-21T04:26:38+5:302021-09-21T04:26:38+5:30
१९६४ मध्ये किल्ले सामानगडाचा काही भाग खचल्यामुळे शासनाने ४६ कुटुंबांचे गावठाणात स्थलांतर केले आहे, परंतु ते भूखंड अद्याप संबंधितांच्या ...

चिंचेवाडीतील भूखंडधारकांचा प्रश्न मार्गी लावणार
१९६४ मध्ये किल्ले सामानगडाचा काही भाग खचल्यामुळे शासनाने ४६ कुटुंबांचे गावठाणात स्थलांतर केले आहे, परंतु ते भूखंड अद्याप संबंधितांच्या नावावर झालेले नाही. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकाऱ्यांनी चिंचेवाडीला भेट दिली. त्या भूखंडाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी भूखंडधारक व ग्रामस्थांशी संवादही साधला.
माजी सभापती अमर चव्हाण म्हणाले, गेली ५७ वर्षे शासनाकडे भुईभाडे आणि ग्रामपंचायतीकडे नियमित घरफाळा भरूनदेखील ते भूखंड अद्याप नावावर झालेले नाहीत. प्रांताधिकाऱ्यांनी ७/१२ पत्रकी नोंद करून भूखंडधारकांना न्याय द्यावा.यावेळी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी एस. एल. घुले, ग्रामसेवक संजय पुकळे, पोलीस पाटील, राजू गुरव, नागेश कोरी, आप्पा घेवडे, जोतिबा घेवडे, तानाजी परीट, महादेव सुतार, सुभाष घेवडे, संदीप नाईक, बाबू सावंत, सुरेश घेवडे, राजू कांबळे, आप्पा कणुकले आदी उपस्थित होते.सर्जेराव कदम यांनी स्वागत केले. अर्जुन सुतार यांनी आभार मानले.