कोगनोळी येथील इसमाची गळफासाने आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:17 IST2021-07-19T04:17:04+5:302021-07-19T04:17:04+5:30
घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सचिन पाटील हा बीएसएनएल कार्यालयात कंत्राटी पद्धतीने काम करीत होता. लॉकडाऊनच्या ...

कोगनोळी येथील इसमाची गळफासाने आत्महत्या
घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सचिन पाटील हा बीएसएनएल कार्यालयात कंत्राटी पद्धतीने काम करीत होता. लॉकडाऊनच्या काळामुळे वेतनावर होणारा परिणाम तसेच त्याला जडलेली व्यसने यांमुळे त्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याचे बोलले जात असले तरी या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही. त्याने बीएसएनएल कार्यालयजवळ असणाऱ्या टॉवरला दोरीच्या साहाय्याने गळफासाने आत्महत्या केल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले.
घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीएसआय अनिल कुंभार, साहाय्यक उपनिरीक्षक एस. ए. टोलगी, अमर चंदनशिव, राजू गोरखनावर, विजय सावोजी यांनी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविला. दुपारी उशिरा मृतदेहाचे विच्छेदन करून तो नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
तोंडाला मास्क व अंगावर रेनकोट तसाच
रात्री बराच काळ रिमझिम पाऊस सुरू होता. या पावसातच सचिन याने दोरीच्या साहाय्याने टॉवरला गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्याच्या अंगावर रेनकोट व तोंडाला मास्क तसाच होता.