लाखाचा मोबाइल चोरल्याप्रकरणी इस्लामपूरच्या चोरट्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:26 IST2021-03-17T04:26:03+5:302021-03-17T04:26:03+5:30

कोल्हापूर : येथील लक्ष्मीपुरीतील रिलायन्स मॉलमधील एक लाख रुपये किमतीच्या आय फोन मोबाइल संच चोरीप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी तरुणास ...

Islampur thief arrested for stealing Rs 1 lakh mobile phone | लाखाचा मोबाइल चोरल्याप्रकरणी इस्लामपूरच्या चोरट्यास अटक

लाखाचा मोबाइल चोरल्याप्रकरणी इस्लामपूरच्या चोरट्यास अटक

कोल्हापूर : येथील लक्ष्मीपुरीतील रिलायन्स मॉलमधील एक लाख रुपये किमतीच्या आय फोन मोबाइल संच चोरीप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी तरुणास अटक केली. शुभम धनंजय आमले (वय २३, रा. बीकेपी कॉलेजजवळ, इस्लामपूर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे, त्याच्याकडून चोरलेला मोबाइल जप्त केला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लक्ष्मीपुरीतील रिलायन्स मॉलमध्ये दि. १२ मार्चला मोबाइल चोरीची घटना घडली होती. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीचा तपास करताना राजवाडा पोलिसांनी मॉलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते, त्यामध्ये चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याचे दिसून आले.

जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी याबाबत डिबी पथकाला सूचना दिल्या. पथकाचे हे. कॉ. अनिल ढवळे, प्रकाश संकपाळ यांनी फुटेजच्या आधारे चोरट्याचा इस्लामपूरपर्यंत माग काढला. तसेच संशयित आरोपी शुभम आमले याच्यावर पाळत ठेवून त्याला मंगळवारी इस्लामपुरातून ताब्यात घेतले. त्याला अटक करून त्याच्याकडून चोरीचा मोबाइल जप्त केला. त्याच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली.

फोटो नं. १६०३२०२१-कोल-शुभम आमले(आरोपी)

Web Title: Islampur thief arrested for stealing Rs 1 lakh mobile phone