शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
2
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
3
अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
4
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
5
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात; ऑटो-FMCG शेअर्समध्ये विक्री
7
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
8
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
9
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
10
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ
11
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
12
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
13
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
14
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
15
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
16
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
17
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
18
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
19
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
20
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य

तुमची जात इतरांपेक्षा कनिष्ठ समजली जाते?; मराठा सर्वेक्षणात विचारणा, १५४ प्रश्नांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 07:56 IST

राज्यभरात हे सर्वेक्षण सुरू झाले. त्यासाठी १५४ प्रश्न, तीन तक्ते व तब्बल ३५ पानांची प्रश्नावली आयोगाने उपलब्ध करून दिली आहे.

- विश्वास पाटीलकोल्हापूर : तुमची जात कोणत्या जातीपेक्षा कनिष्ठ समजली जाते का? कुटुंबात कोण आजारी पडले तर त्यास लवकर आराम पडावा म्हणून दृष्ट काढणे, अंगारा लावणे, गंडा बांधणे आदी प्रकार करता काय, अशी विचारणा महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्यावतीने केल्या जात असलेल्या मराठा व इतर खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणातून केली जात आहे.

मंगळवारपासून राज्यभरात हे सर्वेक्षण सुरू झाले. त्यासाठी १५४ प्रश्न, तीन तक्ते व तब्बल ३५ पानांची प्रश्नावली आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. त्यातील अनेक प्रश्न नवे वाद निर्माण करणारे आहेत. शिक्षक, ग्रामसेवक आणि परिचारिकांच्या मदतीने हे सर्वेक्षण ३० जानेवारीपर्यंत संपवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईकडे कुच केल्याने हे सर्वेक्षण युद्धपातळीवर सुरू आहे.

चुकीची माहिती दिल्यास...प्रश्नावलीमध्ये कौटुंबिक प्रश्न, आर्थिक, सामाजिक स्थितीशी संबंधित प्रश्न आहेत. कुटुंबातील सदस्यांची माहिती व शिक्षण स्थितीचे तक्ते भरून घ्यायचे आहेत. ही प्रश्नावली कुटुंबप्रमुखाकडून भरून घेतली जाणार आहे. त्यात खोटी किंवा चुकीची माहिती दिल्यास त्याच्या परिणामास तुम्ही जबाबदार राहाल, असाही इशारा दिला आहे. 

उपचारासाठी कोणाकडे जाता?सर्वेक्षणात कुटुंबातील कुणाला कुत्रा-माकड, साप-विंचू चावल्यावर किंवा कावीळ झाल्यावर कुणाकडे उपचाराला घेऊन जाता, या प्रश्नाला पहिला पर्याय तांत्रिक-मांत्रिकाचा दिला आहे. दुसरा पर्याय घरगुती उपचार आणि तिसरा पर्याय डॉक्टरचा दिला आहे. असे प्रश्नही विचारले आहेत. 

काही प्रश्न असेही विचारले...  तुमच्या समाजात लग्नामध्ये हुंडा देण्याची पद्धत आहे का, विधवा स्त्रियांना कुंकू लावण्याची, मंगळसूत्र घालण्याची परवानगी आहे का, विधूर पुरुषांचे आणि विधवांचे पुनर्विवाह होतात का, विधवांना शुभकार्यात बोलावले जाते का, त्यांना हळदी-कुंकवाचा मान दिला जातो का, विवाहित स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतला पाहिजे असे बंधन आहे का, मुलीच्या विवाहाचा निर्णय कोण घेते, अशी विचारणा ही प्रश्नावली करते. नवसाला कोंबड्या-बकऱ्याचा बळी देण्याची पद्धत आहे का, असेही त्यामध्ये विचारले आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार