शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

वाघनखाबाबतचा आदेश डोळे झाकून काढला आहे का?, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची विचारणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 13:30 IST

मंत्री मुनगुंटीवार यांच्याकडून चुकीची माहिती

कोल्हापूर : सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधिमंडळात केलेले निवेदन धादांत खोटे आणि चुकीचे आहे, असा आरोप इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केला. सरकारने आत्तापर्यंत वाघनखे संदर्भात काढलेल्या शासन आदेशात छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे असा स्पष्ट उल्लेख केला आहे. मग मंत्रिमहोदय डोळे झाकून शासन आदेश काढतात का? असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला. मंत्री मुनगंटीवार हे कशाप्रकारे दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत याची कागदपत्रे पुरावेच त्यांनी सादर केले. जी वाघनखे भारतात आणली जाणार आहेत ती छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत, असे स्पष्टीकरण म्युझियमकडून देण्यात आल्याचे सावंत यांनी नुकतेच सांगितले होते.यानंतर मंत्री मुनगंटीवार यांनी सभागृहात वाघनखे आणण्यासाठी झालेल्या खर्चाची माहिती दिली. ही माहिती देताना यासाठी फारसा खर्च झालेला नाही. महाराष्ट्र सरकारच्या वतीने लंडनमधून आणली जाणारी वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत असा दावा कोणी केला नाही, असे सांगितले. पण इतिहासाचा अभ्यास नसलेला सांस्कृतिकमंत्री महाराष्ट्राला मिळाल्याची टीका सावंत यांनी केली. वाघनखाबाबतीत मुनगंटीवार सभागृहात धडधडीत खोट बोलले आहेत. याबाबत त्यांनी कोणतेही पुरावे न देता सभागृहात माहिती दिली. जर त्यांच्याकडे पुरावे नसतील तर तसे सांगावे, पण जनतेची फसवणूक करू नका, असे सावंत यांनी बजावले.या संबंधित काढण्यात आलेल्या शासन आदेशातच लंडनमधून आणण्यात येणारी वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचे म्हटले आहे. यासाठी सहा कोटी रुपयांची तरतूद केल्याचाही उल्लेख आदेशात आहे. पण मुनगंटीवार वाघनखासाठी फारसा खर्च झाला नसल्याची चुकीची माहिती देत लोकांची दिशाभूल केली. राज्यातील सरकार भारतात तोतया वाघनखे आणत असल्याचा आरोप करत सावंत यांनी केला. याप्रकरणी महाराष्ट्राची फसवणूक होऊ देऊ नका, असे आवाहन त्यांनी विरोधी पक्षांना केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजhistoryइतिहास