शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

इराणी टोळीचा चेन स्नॅचर गजाआड, साथीदार फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 11:55 IST

Crimenews Kolhapur- महाडिक वसाहत येथे महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पळालेल्या इराणी टोळीतील दुचाकीस्वार चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने जयसिंगपूर येथे अटक केली.

ठळक मुद्देइराणी टोळीचा चेन स्नॅचर गजाआड, साथीदार फरार दुचाकी, चोरीची चेन हस्तगत ; महाडिक वसाहतीतील प्रकार उघड

कोल्हापूर : महाडिक वसाहत येथे महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पळालेल्या इराणी टोळीतील दुचाकीस्वार चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने जयसिंगपूर येथे अटक केली.

मोहमद फिरोज इराणी (वय २१, रा. खाजा वस्ती, इराणी चाळ, रेल्वे स्टेशन, सांगली. मूळगाव- जन्नतनगर, धारवाड, रा. कर्नाटक) असे अटक केलेल्या चेन स्नॅचरचे नाव आहे. त्याच्याकडून चोरलेली सोन्याची चेन व दुचाकी असा सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला. त्याचा दुसरा साथीदार दादू राजहुसेन इराणी (रा. खाजा वस्ती, इराणी चाळ, सांगली) हा अद्याप फरारी आहे. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. १५ मार्च रोजी सकाळी इंदूबाई बाळासाहेब समुद्रे (वय ५०, रा. विक्रमनगर) या कामानिमित्त महाडिक वसाहत येते जाताना दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसका मारून नेली होती. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. गुन्हा करताना चोरट्यांनी वापरलेली दुचाकी जयसिंगपूर येथे घेऊन चोरटे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना मिळाली, त्यानुसार पोलिसांनी जयसिंगपूर रेल्वे स्टेशन ते उदगाव या मार्गावर सापळा रचला. त्यावेळी त्याच वर्णनाची दुचाकी घेऊन येणाऱ्यास पोलिसांनी अडवले.

दुचाकीबाबत खात्री करुन दुचाकीस्वार मोहमद इराणी याला ताब्यात घेतले. त्याने कोल्हापुरात महाडिक वसाहत येथे चेन स्नॅचिंगचा गुन्हा केल्याचे कबूल केले, त्याच्याकडून चोरलेली सोन्याची चेन व दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केला. त्याचा साथीदार दादू इराणी हा अद्याप फरारी आहे. त्याचा शोध सुरु आहे.दुचाकी ठाणे येथून चोरलीअटक केलेल्या मोहमद इराणी याच्याकडे मिळालेली दुचाकी त्याने ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे निष्पन्न झाले. त्याबाबत मुंब्रा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर