शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बनावट औषध पुरवठ्यात कोल्हापूरच्या ‘विशाल एन्टरप्रायझेस’चा सहभाग, नागपूरमध्ये गुन्हा दाखल

By उद्धव गोडसे | Updated: October 23, 2024 19:17 IST

देशभर मोठे रॅकेट, उत्पादकांचा शोध सुरू

उद्धव गोडसेकोल्हापूर : नागपूरमधील शासकीय रुग्णालयास बनावट औषधांचा पुरवठा केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाने महाराष्ट्र आणि गुजरातमधील चार पुरवठादारांवर गुन्हा दाखल केला. यात कोल्हापुरातील बाबूजमाल रोड येथील ‘विशाल एन्टरप्रायझेस’ फर्मचा सहभाग आहे. फर्मचे मालक सुरेश दत्तात्रय पाटील यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल झाला असून, बनावट औषधांच्या उत्पादकांचा शोध सुरू आहे. देशभर पसरलेल्या रॅकेटमधून कोट्यवधी रुपयांची बनावट औषधे विकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.नागपूर येथील औषध निरीक्षक नितीन पद्माकर भांडारकर (वय ५८, रा. नागपूर) यांनी २१ ऑगस्ट २०२३ मध्ये तेथील शासकीय रुग्णालयातील औषधांची तपासणी केली. कोल्हापुरातील विशाल एन्टरप्रायझेस या कंपनीने पुरवलेल्या ७७ हजार ३७० गोळ्या बनावट असल्याचे लक्षात येताच त्यांनी संबंधित कंपनीस पत्रव्यवहार केेला. ‘विशाल एन्टरप्रायझेस’ने या गोळ्या सुरत (गुजरात) येथील कंपनीकडून मागवल्याचे सांगितले. सुरतमधील कंपनीने मुंबईतील भिवंडी येथील कंपनीकडे बोट दाखवले. भिवंडीमधील कंपनीने ठाणे येथील कंपनीतून गोळ्या मागवल्याचे सांगितले. मात्र, ठाण्यातील कंपनीच्या पत्त्यावर पाहणी केली असता, गोळ्यांचा पुरवठा केलेली कंपनी बंद झाली असून, त्या ठिकाणी नवीन कंपनी सुरू झाल्याचे निदर्शनास आले. बनावट औषधांचा पुरवठा करून रुग्णांच्या जीवाशी खेळ केल्याबद्दल औषध सुरक्षा अधिकारी भांडारकर यांनी नागपुरातील अजनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.दोघांना अटकबनावट औषधांच्या उत्पादक कंपनीचा शोध घेण्याचे काम नागपूर पोलिसांकडून सुरू आहे. या गुन्ह्यातील मिहिर त्रिवेदी (रा. भिवंडी, मुंबई) आणि विजय शैलेंद्र चौधरी (रा. ठाणे) या दोघांना अटक झाली आहे. बनावट औषधांच्या रॅकेटमधील अन्य संशयितांना अटक झाल्यानंतर मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmedicineऔषधंCrime Newsगुन्हेगारी