दीर्घ पल्ल्याच्या परताव्यासाठी गुंतवणूक महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:17 IST2021-07-18T04:17:45+5:302021-07-18T04:17:45+5:30
कोल्हापूर : दीर्घकालीन पल्ल्याच्या परताव्यासाठी गुंतवणूक महत्त्वाची असून, त्यासाठी आर्थिक नियोजन व्यवस्थित करण्याची गरज आहे, असा सल्ला प्रोफिसियंत माईंड ...

दीर्घ पल्ल्याच्या परताव्यासाठी गुंतवणूक महत्त्वाची
कोल्हापूर : दीर्घकालीन पल्ल्याच्या परताव्यासाठी गुंतवणूक महत्त्वाची असून, त्यासाठी आर्थिक नियोजन व्यवस्थित करण्याची गरज आहे, असा सल्ला प्रोफिसियंत माईंड संस्थेचे सुहास रजपूत यांनी दिला.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अंतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य विभागामार्फत ‘पैशाचे व्यवस्थापन’ या विषयावर वेबिनार घेण्यात आला. अध्यक्षस्थानी विभागप्रमुख डॉ. श्रीकृष्णा महाजन होते. रजपूत यांनी गुंतवणुकीविषयी सविस्तर माहिती देताना परतावा व जोखीम तपासण्याबरोबरच शिस्त व संयमाची जोड दिली तर चांगल्याप्रकारे संपत्ती तयार करता येऊ शकते, असे सांगितले.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना महाजन म्हणाले की, शेअर बाजाराविषयी ज्ञान व जागरुकता ही त्याबाबतची कौशल्ये विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. पैशाचे व्यवस्थापन हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असल्याने त्याप्रमाणेच नियोजन करण्याची गरज आहे. यावेळी वॉरेन बफेट, चार्ली मंगर, स्टीफन कोवे, बेन्जामीन फ्रान्कलीन यांनी गुंतवणुकीबाबतचे तंत्र सांगितले व विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरासनही केले. स्वागत, प्रास्ताविक डॉ. के. व्ही. मारुलकर यांनी केले तर डॉ. दीपा इंगवले यांनी आभार मानले. डॉ. एच. एम. ठाकर, डॉ. ए. एम. गुरव, डॉ. अनुप मुळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
फोटो: १७०७२०२१-कोल-एसयूके रजपूत
(सुहास रजपूत)