कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाने दूध संस्थांना देण्यासाठी खरेदी केलेला जाजम व घडळ्याची चौकशी मंगळवारपासून सुरू झाली आहे. मुख्य चौकशी अधिकारी तथा द्वितीय विशेष लेखापरीक्षक वर्ग -१ (साखर) सातारा सदाशिव गोसावी यांच्यासह तिघांच्या पथकाने तपासणी सुरू केली असून, साधारणत: आठ दिवस हे काम चालणार आहे. खुल्या निविदाविना संचालक मंडळाने चार कोटीची खरेदी केल्याची तक्रार आहे.‘गोकुळ’ने हीरक महोत्सवी वर्षानिमित्त दूध संस्थांना देण्यासाठी जाजम व घड्याळ खरेदी केली होती. साधारणत: सहकारी संस्थांमध्ये होणाऱ्या खरेदी या खुल्या निविदांच्या माध्यमातून केली जाते. पण, सुमारे चार कोटी किमतीचा जाजम व घड्याळ्याची खरेदी केवळ कोटेशनवर केली आहे. याबाबत, उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी याबाबत दुग्ध विभागाकडे तक्रार केली होती.त्यानुसार, विभागीय उपनिबंधक (दुग्ध) राजकुमार पाटील यांनी तत्कालीन विशेष लेखापरीक्षक सहकार संस्था वर्ग-२ (पदुम) सांगली सदाशिव गोसावी यांची २४ ऑगस्टला नियुक्ती केली. सुरुवातीच्या टप्प्यात पुरेसे कर्मचारी नसल्याने चौकशीला विलंब झाला. तोपर्यंत २४ सप्टेंबरला गोसावी यांची पदोन्नतीवर बदली द्वितीय विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ (साखर) सातारा या पदावर झाली. त्यामुळे चौकशीला खो बसला होता.तक्रारदारांनी रेटा लावल्यानंतर सदाशिव गोसावी यांनी मंगळवारपासून चौकशी सुरू केली आहे. साधारणत: आठ दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.
‘गोकुळ’च्या जाजम, घड्याळ खरेदीची चाैकशी सुरू केली आहे. तपासणीसाठी किती दिवस लागतील, हे आताच सांगता येणार नाही. - सदाशिव गोसावी (चौकशी अधिकारी)
Web Summary : An inquiry has started into Gokul Milk Union's purchase of carpets and watches for milk institutions. Allegations suggest a four-crore purchase was made without open tenders, prompting an investigation expected to last eight days.
Web Summary : गोकुल दूध संघ द्वारा दूध संस्थानों के लिए कालीन और घड़ियों की खरीद की जांच शुरू हो गई है। आरोपों के अनुसार, बिना खुली निविदाओं के चार करोड़ की खरीद की गई, जिसकी जांच आठ दिनों तक चलने की उम्मीद है।