शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: 'एएस ट्रेडर्स'च्या तपासाचे गौडबंगाल; मेकर, क्रिप्टो करन्सीसह एकूण २० गुन्ह्यांमध्ये सव्वाशे कोटींची फसवणूक

By उद्धव गोडसे | Updated: February 4, 2025 18:43 IST

तपासांचे पुढे काय झाले? असा सवाल गुंतवणूकदारांकडून उपस्थित केला जात आहे

उद्धव गोडसेकोल्हापूर : मोठ्या फसवणुकीचे गुन्हे तपासासाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवले जातात. गेल्या दोन वर्षांत आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून २० गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. यातील अटक केलेल्या १३० पैकी ७० आरोपींवर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. मात्र, एएस ट्रेडर्स, धनशांती, क्रिप्टो करन्सी, शासकीय जमीन खरेदी-विक्री घोटाळा, अशा महत्त्वाच्या अनेक गुन्ह्यांच्या तपासाला अपेक्षित गती नाही. त्यामुळे या तपासांचे पुढे काय झाले? असा सवाल गुंतवणूकदारांकडून उपस्थित केला जात आहे.शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेक बोगस कंपन्यांनी लोकांना गंडा घातला. क्रिप्टो करन्सी, बिटकॉईन, कमी व्याज दरात कर्ज देणे, शासकीय जमीन नावावर करून देण्याच्या बहाण्याने अनेकांनी फसवणूक केली. गेल्या दोन-तीन वर्षांत फसवणुकीची मालिकाच सुरू होती. २०२३ मध्ये जिल्ह्यात फसवणुकीचे १३५९ गुन्हे दाखल झाले होते. २०२४ मध्ये ही संख्या २०१ पर्यंत खाली आली.

दोन वर्षांतील प्रमुख २० गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे. यात शेअर ट्रेंडिग, क्रिप्टो करन्सी, एकच मिळकत अनेकांना विकणे, शासकीय जमीन स्वत:च्या नावावर करून घेऊन शासनाची फसवणूक करणे, इचलकरंजीतील कापड व्यवहारात झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

एएसमधील काही आरोपी मोकाटचएएस ट्रेडर्ससह इतर महत्त्वाच्या गुन्ह्यांचा तपास अजूनही सुरूच आहे. यातील काही आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत. एएस ट्रेडर्स फसवणुकीचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे. यात एकूण ३४ आरोपी निष्पन्न झाले आहेत. प्रमुख सूत्रधार लोहिसतिंग सुभेदार याच्यासह २३ संशयितांना अटक झाली आहे. अटकेतील सर्व संशयितांवर आरोपपत्र दाखल केले असून, सुमारे चार कोटींची मालमत्ता जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.सव्वाशे कोटींची फसवणूकएकूण २० गुन्ह्यांमध्ये १२५ कोटी ६८ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. या गुन्ह्यांमध्ये सुमारे १५० संशयित आरोपींचा समावेश आहे. यातील १३० जणांना पोलिसांनी अटक केली. त्यापैकी ७० जणांवर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. उर्वरित संशयितांवर पुरवणी आरोपपत्र दाखल केली जात आहेत.

या गुन्ह्यांचा तपास सुरूगुन्हा - फसवणूक रक्कम - निष्पन्न आरोपीएएस ट्रेडर्स - २३ कोटी - ३४वेल्थ शेअर - २५ ते ३० कोटी - ५धनशांती ट्रेडर्स - २ कोटी ८० लाख - ५मेकर ॲग्रो - २६ कोटी - २३क्रिप्टो करन्सी (जीडीसीसी) - १२ कोटी ३८ लाख - १७क्रिप्टो करन्सी - १३ कोटी ९२ लाख - ६बोगस फ्लॅट विक्री - ११ कोटी - ५३

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस