शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवारांच्या मालमत्तेची चौकशी करा, क्षीरसागर गट आक्रमक 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: August 10, 2023 18:19 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार

कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी निवडणुकीत सादर केलेल्या प्रमाणपत्रात कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असल्याचे जाहीर केले आहे. व्हिडीओ गेम पार्लर शिवाय इतर उत्पनाचे स्त्रोत नसताना त्यांनी ही संपत्ती कशाच्या जीवावर कमवली याची सखोल चौकशी करा, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे यांना याबाबतचे निवेदन दिले. पवार आणि टोळी शासकीय कार्यालयात आंदोलने करत अधिकाऱ्यांना धमकावून पैसे वसूलीचा धंदा करत असल्याचा आरोपही करण्यात आला.पवार यांनी जयप्रभा स्टुडिओ प्रकरणात नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या व्यवहाराची चौकशीची मागणी केली होती. यानंतर क्षीरसागर गटाने ही पवार यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली. महिला आघाडी महानगरप्रमुख मंगल साळोखे, पवित्रा रांगणेकर, पूजा भोर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने याबाबत निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, संजय पवार यांनी अनेक वर्षे गैरकृत्यातून कोट्यवधींची संपत्ती गोळा केली आहे. ते पद्मा टॉकीज चौकातील खासगी दुकान गाळ्यामध्ये बसून नागरिक, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी यांना त्यांना धमकावून हप्ते वसूल करतात. पवार आणि टोळी आंदोलने करत अधिकाऱ्यांना धमकावून पैसे वसूल करते. पवार यांचे व्हिडीओ गेम पार्लर शिवाय कोणतेही इतर आर्थिक स्त्रोत नसताना त्यांनी निवडणुक आयोगास सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात कोट्यावधी रुपयांची मालमत्ता असल्याचे कबूल केले आहे. ही मालमत्ता त्यांनी गोळा केली कशी..? याची सखोल चौकशी करावी अन्यथा, जनआंदोलन उभे करु.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाSanjay Pawarसंजय पवारRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागर