शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तपास सीआयडीकडे द्या: शिरोळ माने आत्महत्या प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 00:40 IST

शिरोळ : खोट्या गुन्ह्याची भीती घालून खंडणी मागितल्यामुळेच राजाराम माने यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले.

ठळक मुद्देकुटुंबियांची मानवाधिकार आयोगाकडे धाव कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावयाचा याबाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा

शिरोळ : खोट्या गुन्ह्याची भीती घालून खंडणी मागितल्यामुळेच राजाराम माने यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले. त्यामुळे माझ्या कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त करणाºया संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पाठीशी न घालता या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाकडे द्यावा, अशी मागणी मृत राजाराम माने यांची पत्नी वासंती माने यांनी केली आहे.

याबाबतचे निवेदन राष्ट्रीय मानवाधिकार यांच्यासह राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री, पोलीस महासंचालकांना पाठविले आहे.निवेदनात असे म्हटले आहे की, गुन्हेगार प्रवृत्तीच्या पोलिसांनी माझे पती राजाराम यांना खोट्या गुन्ह्यात व अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती घालून नाहक त्रास दिला. वेळोवेळी खंडणी स्वरुपात रक्कम घेतली. आणखीन रकमेसाठी पोलिसांनी त्रास देवून तगादा लावल्यामुळेच हा प्रसंग घडला. पोलिसांच्या या कृत्यामुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावयाचा याबाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाºयांची चौकशी झाली पाहिजे. त्याचबरोबर शिंदे नामक पोलिसावर अद्याप कारवाई झालेली नाही. राजाराम यांच्या आत्महत्येस जबाबदार असणाºया पोलिस निरीक्षक उदय डुबल, भुजंग कांबळे, निखिल खाडे, शशिकांत साळुंखेसह शिंदेनामक पोलिसावर कारवाई करावी, यासाठी या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे देण्याची मागणी निवेदनात केली आहे.आत्महत्येप्रकरणी २४ जणांची चौकशीसंशयित आरोपी निखिल खाडे याच्या मोबाईलवरील कॉल डिटेल्सवरून सोमवारपर्यंत २४ जणांची चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास सुरूआहे. शिंदे नावाच्या पोलिसाबाबतही चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयित पोलीस कॉन्स्टेबल भुजंग कांबळे, स्वाती माने, निखिल खाडे, शशिकांत साळुंखे व शिंदेनामक पोलीस अशा पाचजणांवर गुन्हा दाखल झाला असून, चौघांना १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. खाडे याच्या मोबाईलवरील कॉल डिटेल्सची तपासणी करण्यात आली असून, आतापर्यंत २४ जणांचे जबाब नोंदविण्यात आलेले आहेत. खाडे याच्या मोबाईलवरून ज्यांना ज्यांना कॉल गेले आहेत, त्या सर्वांची चौकशी सुरू असल्याची माहिती सपोनि समीर गायकवाड यांनी दिली.

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर