स्थायी, परिवहन समितीच्या सदस्यांसाठी १७ ला मुलाखती

By Admin | Updated: December 9, 2014 00:28 IST2014-12-09T00:18:59+5:302014-12-09T00:28:04+5:30

अनेकांनी लावली ‘फिल्डिंग’ : १८ डिसेंबरला होणार निवडीची घोषणा

Interviews for permanent, transport committee members 17 | स्थायी, परिवहन समितीच्या सदस्यांसाठी १७ ला मुलाखती

स्थायी, परिवहन समितीच्या सदस्यांसाठी १७ ला मुलाखती

कोल्हापूर : महापालिकेच्या आर्थिक चाव्या असलेल्या परिवहन व स्थायी समिती अनुक्रमे सहा व आठ सदस्यांची मुदत ३१ डिसेंबरला संपत आहे. या जागी नव्या सदस्यांची निवड २० डिसेंबरच्या सर्वसाधारण सभेत जाहीर होणार आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक उद्या, मंगळवारपासून १५ डिसेंबरपर्यंत ‘दिल्ली सहली’वर आहेत. त्यामुळे ‘स्थायी’सह परिवहन व महिला बालकल्याण सदस्यपदी इच्छुकांच्या मुलाखती १६ किंवा १७ डिसेंबरला होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्यात ठरलेल्या ‘फॉर्म्युल्या’नुसार महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, परिवहन सभापती आदी पदांचे जानेवारी महिन्यात खांदेपालट होत आहे. महापौर व परिवहन सभापतिपद काँग्रेसच्या वाट्याला जाणार आहे, तर उपमहापौरपदासह स्थायी समिती सभापतिपद राष्ट्रवादीकडे येणार आहे. यापदी वर्णी लावण्यासाठी इच्छुकांनी नेत्यांकडे तगादा लावला आहे. नेत्यांनी कोणासही ‘शब्द’ दिलेला नाही. नगरसेवकांच्या दिल्लीवारीनंतरच या निवडीसाठीच्या हालचाली गतिमान होण्याची शक्यता आहे.
‘रंकाळा दिवस’ बाबत बैठक
रंकाळा तलावाच्या संवर्धनासाठी व संरक्षणासाठी पुढे आलेल्या संघटनांकडून २५ डिसेंबर हा रंकाळा दिवस म्हणून साजरा केला. त्यानुसार यंदाही हा दिवस साजरा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.१०) सकाळी ७ वाजता रंकाळा चौपाटी परिसरातील नवनाथ मंदिर येथे बैठक आयोजित केली आहे.

निवृत्त होणारे सदस्य
स्थायी समिती : राजू घोरपडे, राजू लाटकर, महेश गायकवाड, सुनील पाटील, सतीश लोळगे, यशोदा मोहिते, राजू हुंबे व सुभाष रामुगडे.


परिवहन समिती : सभापती वसंत कोगेकर, राजाराम गायकवाड, रेखा पाटील, स्मिता माळी, रेखा आवळे, सतीश लोळगे.
.महिला व बालकल्याण समितीच्या नऊ सदस्यांसह सभापतीची नव्याने निवड होणार आहे. त्यामध्ये चार काँग्रेस, तीन राष्ट्रवादी, एक जनसुराज्य व सेना-भाजप प्रत्येकी एक याप्रमाणे सदस्य निवड केली जाणार आहे.

Web Title: Interviews for permanent, transport committee members 17

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.