कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी राज्यभरातून आलेल्या पात्र उमेदवारांच्या मुलाखती ३ आणि ४ एप्रिलला लोकभवनात होणार आहेत. प्राप्त ११५ अर्जांमधून पात्र उमेदवारांची छाननी पूर्ण झाली असून २५ संभाव्य उमेदवारांमधून कुलगुरू पदासाठी निवड समितीकडून मुलाखतीची प्रक्रिया पार पडणार आहे.मुलाखतीनंतर पाच उमेदवारांची नावे अंतिम करण्यात येणार असून त्या पाच जणांमधून एका उमेदवाराची कुलगुरू म्हणून निवड केली जाणार आहे. या संभाव्य उमेदवारांमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, माजी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील आणि रसायनशास्त्र विभागाचे डॉ. आर. जी. सोनकवडे या तिघांनाही गुरुवारी सायंकाळी मेल आला आहे.कुलगुरुपदासाठी आलेल्या अर्जांची छाननी ९ व १० फेब्रुवारीला दोन दिवस करण्यात आली. त्यानंतर पात्र उमेदवारांची कच्ची यादी निश्चित करण्यात आली असून त्यावर हरकती मागवण्यात येणार आहेत. हरकतींचे निरसन झाल्यानंतर अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. विद्यमान कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांचा पाच वर्षांचा कार्यकाल ६ ऑक्टोबर रोजी पूर्ण झाला. त्यापूर्वीच नव्या कुलगुरूची नियुक्ती होणे अपेक्षित होते. सध्या पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला आहे.नूतन कुलगुरूपदासाठी कुलपती कार्यालयाने २३ डिसेंबर ते २७ जानेवारी या कालावधीत अर्ज मागवले होते. या प्रक्रियेसाठी भारतीय विद्यापीठ, कोईम्बतूर येथील गणित विभागाचे प्रा. एस. सरवनन यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कुलगुरू निवडीकडे शिक्षण वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Interviews for Shivaji University's Vice-Chancellor post will be held April 3-4. Twenty-five candidates are shortlisted from 115 applications. The selection committee will finalize five names, from which the new Vice-Chancellor will be chosen. The process aims to appoint a successor to Dr. D. T. Shirke.
Web Summary : शिवाजी विश्वविद्यालय के कुलपति पद के लिए साक्षात्कार 3-4 अप्रैल को होंगे। 115 आवेदनों में से पच्चीस उम्मीदवार चुने गए हैं। चयन समिति पाँच नामों को अंतिम रूप देगी, जिनमें से नए कुलपति का चयन किया जाएगा। डॉ. डी. टी. शिर्के के उत्तराधिकारी की नियुक्ति का लक्ष्य है।