शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

International Women's Day 2023: महिलांना विश्रांती; पुरुष करणार स्वयंपाक, कोल्हापुरातील 'या' पंचायतीची नवी संकल्पना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 12:25 IST

पुरुष मंडळींनी महिला दिनादिवशी स्वयंपाकघर सांभाळावे

जहाँगीर शेख कागल : कागल पंचायत समितीच्या वतीने आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त एक वेगळीच संकल्पना घेऊन या वर्षीचा महिला दिन साजरा करण्यात येत आहे. महिला दिनादिवशी एक दिवस घरातील पुरुष मंडळींनी जेवण बनवावे आणि महिलांना एक दिवस या कामातून सुट्टी द्यावी, असे हे आवाहन केले असून त्यासाठी गावांनी पुढाकार घ्यावा म्हणून ग्रामपंचायतींना पत्रे पाठविली आहेत. स्त्रीच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळावी, असा या उपक्रमामागील हेतू आहे.पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि प्रशासक सुशीलकुमार संसारे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम जाहीर करण्यात आला आहे. महिला दिनादिवशी गावात विविध उपक्रम घ्यावेत; पण एक दिवसासाठी महिलांना स्वयंपाकापासून बाजूला ठेवून स्वत: पती अथवा मुलांनी जेवण बनवावे. फार नाही झाले तरी किमान चहा तरी आपल्या हातचा करून पत्नीला द्यावा. ज्यांना शक्य आहे त्यांनी बाहेरून तयार जेवण आणावे. ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन सामुदायिक जेवण करावे. होम मिनिस्टर सारखे कार्यक्रम आयोजित करावेत, अशाही सूचना केल्या आहेत.यातील महत्त्वाचा मुद्दा घरातील पुरुष मंडळींनी महिला दिनादिवशी स्वयंपाकघर सांभाळावे हा आहे. पंचायत समितीशी संबंधीत घटक या संकल्पनेचे महत्त्व गावोगावी सांगत आहेत. आता या अभिनव संकल्पनेस किती प्रतिसाद मिळणार आणि राजकीयदृष्ट्या जागरुक तालुका महिलांच्या श्रमाचे किती मोल करणार याबद्दल उत्सुकता आहे.

महिला गृहिणी असो अथवा नोकरी करणारी असो. स्वयंपाक ही तिचीच जबाबदारी असते. आणि याबद्दल तिच्या मनात कधीही नकारात्मक भावनाही नसते. मात्र, एक दिवस यातून त्यांना विश्रांती दिली तर त्यांना महिला दिनाची एक आठवण वर्षभर राहील आणि यातून कौटुंबिक स्नेहही आणखीन वृद्धिंगत होईल. - सुशीलकुमार संसारे, गटविकास अधिकारी कागल

होय, मी दोन वेळचा स्वयंपाक करणारकरनूर (ता. कागल) येथील कार्यकर्ते बाळासाहेब पाटील यांनी या आवाहनाला प्रतिसाद देत एका पत्राद्वारे पंचायत समितीचे अभिनंदन केले आहे. मी यादिवशी दोन्ही वेळचे जेवण करून पत्नी व सुनेला महिला दिनाची भेट देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. महिला दिन यातून घरोघरी पोहचेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWomen's Day Specialजागतिक महिला दिनkagal-acकागल