मोहोळकर यांना आंतरराष्ट्रीय रिसर्च एक्सलन्स पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:18 IST2021-07-11T04:18:12+5:302021-07-11T04:18:12+5:30
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान अधिविभागातील संशोधक डॉ. अण्णासाहेब मोहोळकर यांची ‘इंटरनॅशनल रिसर्च व सायन्स, हेल्थ अँड इंजिनिरिंग ...

मोहोळकर यांना आंतरराष्ट्रीय रिसर्च एक्सलन्स पुरस्कार
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान अधिविभागातील संशोधक डॉ. अण्णासाहेब मोहोळकर यांची ‘इंटरनॅशनल रिसर्च व सायन्स, हेल्थ अँड इंजिनिरिंग ’ अर्थात सायन्स फादर संस्थेच्या 'आंतरराष्ट्रीय रिसर्च एक्सलन्स' पुरस्कारासाठी निवड झाली. ही संस्था दरवर्षी विज्ञान शाखेत उत्तम कामगिरी बजावणाऱ्या संशोधकांचा विविध पुरस्कार प्रदान करून गौरव करते. डॉ. मोहोळकर यांनी मटेरियल सायन्स क्षेत्रात केलेल्या संशोधनाची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली.
गतवर्षी अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने घेतलेल्या सर्वेक्षणात जागतिक क्रमवारीत टॉप २ टक्के शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये त्यांना स्थान मिळाले होते. त्यांना व्हिनस इंटरनॅशनल संस्थेमार्फत या वषीर्चा 'मटेरियल सायन्स विशेषज्ज्ञ' पुरस्कारही जाहीर झाला आहे. डॉ. मोहोळकर यांनी विविध विषयांवर पेटंट मिळविले आहेत. शिवाजी विद्यापीठातून पीएच.डी. पदवी घेतल्यानंतर दक्षिण कोरियातून पोस्ट डॉक्टरेट केले. २००९ साली बॉईजकास्ट फेलो म्हणून भारतातून ७२, तर महाराष्ट्रातून दोघांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ते एक आहेत. सध्या ते काही आघाडीच्या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांचे संपादक व रिव्ह्यूअर म्हणून काम पाहतात. विद्यार्थ्यांच्या अंगी संशोधन अभिवृत्ती निर्माण व्हावी व समाजातील प्रश्न घेऊन विज्ञान व संशोधनाच्या माध्यमातून ते सोडविण्यासाठी डॉ. मोहोळकर पुढाकार घेतात. त्यांनी अनेक गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना परदेशात पोस्ट डॉक्टरेट करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.
फोटो : १००७२०२१-कोल-आण्णासाहेब मोहोळकर