शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

आंतरराष्ट्रीय ख्यातनाम नेहरू यांची हॅट्ट्रिक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 00:09 IST

- वसंत भोसले देशाची फाळणी, राज्यघटना, पहिल्या दोन सार्वत्रिक निवडणुका, भाषावार प्रांतरचना आदी दिव्यातून भारतीय लोकशाहीची वाटचाल पुढे चालू ...

- वसंत भोसलेदेशाची फाळणी, राज्यघटना, पहिल्या दोन सार्वत्रिक निवडणुका, भाषावार प्रांतरचना आदी दिव्यातून भारतीय लोकशाहीची वाटचाल पुढे चालू होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाची १५ वर्षे होत आली होती. त्यांनी देशाच्या विकासासाठी ना भांडवलशाही ना समाजवादी अर्थव्यवस्थेऐवजी मिश्र अर्थव्यवस्थेचा मध्यम मार्ग स्वीकारला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर जगाचे दोन गट पडले होते. एका गटाचे नेतृत्व अमेरिका करीत होता, तर दुसऱ्या गटात रशियाच्या नेतृत्वाखाली अनेक कम्युनिस्ट देश एकवटले होते. अशा परिस्थितीत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिसऱ्या जगाची मांडणी करून, त्यासाठी अलिप्ततावादी तत्त्वप्रणालीनुसार अलिप्त राष्ट्रांची चळवळ उभी केली होती.पहिल्या दोन्ही सार्वत्रिक निवडणुकांद्वारे एक देशव्यापी नेतृत्व आता आंतरराष्ट्रीय ख्यातनाम होत आले होते. मात्र, त्यांचा कल रशियाच्या बाजूने अधिक होता. त्यामुळे रशियाने स्वीकारलेल्या नियोजनबद्ध विकासाची कल्पना त्यांनी राबविण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना, पंचवार्षिक योजना, आदी मार्ग अवलंबले होते. त्याबरोबर सार्वजनिक क्षेत्रातील मोठमोठे उद्योग उभे करण्याचा सपाटा लावला होता. अनेक धरणांची आखणी केली होती. ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन दिले होते. एका नव्या राष्ट्र उभारणीच्या कामाने गती पकडली होती आणि उद्योगपतींपासून कामगारांपर्यंत शेतकऱ्यांपासून शेतमजुरांपर्यंत सर्वांचे नेतृत्व स्वत:कडे खेचून आणण्यात पंडित जवाहरलाल नेहरू यशस्वी झाले होते. त्याचवेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरही एक स्वत:ची ओळख निर्माण केली होती.अशा वातावरणात तिसºया लोकसभेसाठी देशात १९ फेब्रुवारी १९६२ पासून सार्वत्रिक निवडणुका सुरू झाल्या. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सत्तरी पार केली असली तरी त्यांचा करिष्मा कमी झालेला नव्हता आणि त्यांनी देशाच्या विकासाला दिलेला आकार समजातील सर्व स्तरातील मतदारांना पसंत पडला होता. त्यामुळे २१ कोटी ६३ लाख ६१ हजार ५५९ मतदारांपैकी ५५.४२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी ४४.७२ टक्के मते घेऊन काँग्रेसने ४९४ जागांपैकी ३६१ जागा जिंकल्या. देशाच्या इतिहासात यावेळी दुसºयांदा मतदारसंघाची रचना झाली होती. राखीव जागा स्वतंत्र दिल्या होत्या. ४९४ मतदारसंघांपैकी १०९ जागा (अनुसूचित जाती ७९ आणि जमातीसाठी ३०) राखीव ठेवण्यात आल्या होत्या.प्रथमच एका मतदारसंघातून एकच उमेदवार निवडण्याची प्रक्रिया संपूर्ण देशभर राबविण्यात आली होती. अठरा राज्यांची आता निर्मिती झाली होती. १ नोव्हेंबर १९५६ला कर्नाटकची निर्मिती झाली होती. द्विभाषिक राज्यातून महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली. त्यानंतर दोन वर्षांनी या निवडणुका झाल्या. १९५७ चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा जोर ओसरला होता. मुंबई महाराष्ट्राला मिळाली होती. बेळगावसह जो सीमाभाग कर्नाटकात राहिला, ती बोच कायम होती.महाराष्ट्रात यावेळी ४४ मतदारसंघ तयार झाले होते. त्यापैकी ४१ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. नागपूरमध्ये महाधो श्रीहरी अणे आणि चांदामधून लाल श्यामलाल भगवानशहा हे अपक्ष म्हणून निवडून आले, तर कोकणातील राजापूरमध्ये प्रजा समाजवादी पक्षाचे बॅ. नाथ पै विजयी झाले होते. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने घवघवीत यश मिळविले होते.