शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

हातकणंगले मतदारसंघात अंतर्गत राजकीय घडामोडींनाही वेग; कोरे-आवाडे-यड्रावकर यांच्यात एक तास बंद खोलीत चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 16:13 IST

तिघांमध्ये नेमकी काय खलबत्ते सुरू आहेत, याबाबत चर्चेला उधाण

इचलकरंजी : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराबरोबरच इतर अंतर्गत राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. बुधवारी (दि.१०) रात्री आमदार विनय कोरे यांनी आमदार प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानी भेट दिली. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आल्याचे ते सांगत असले तरी त्यांच्यात तब्बल एक तास बंद खोलीत चर्चा झाली. त्यानंतर आमदार आवाडे यांनी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्यातही मध्यरात्रीपर्यंत चर्चा झाल्याचे खात्रीलायक समजते. त्यामुळे या तिघांमध्ये नेमकी काय खलबत्ते सुरू आहेत, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आमदार आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले असले तरी त्यांनी अद्याप नेमकी भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. आमदार आवाडे आणि आमदार कोरे यांच्यात तब्बल पाऊण तास चर्चा झाल्याचे समजते. मात्र, याचा तपशील मिळाला नाही.

या चर्चेवेळी आवाडे कुटुंबीय वगळता बाहेरचे कोणीही नव्हते. त्यानंतर आवाडे यांनी रात्री उशिरा यड्रावकर यांची भेट घेतली. त्यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाल्याचे समजते. त्यानंतर आवाडे मध्यरात्री घरी परतले. त्यांच्यात कोणती चर्चा झाली, याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत. या मतदारसंघात कोरे, यड्रावकर, आवाडे या तीनही आमदारांची मोठी ताकद आहे. त्यामुळे हे तिघे नेमकी कोणती भूमिका घेणार, याबाबत चर्चा होत असताना या तिघांची भेट झाल्याने आणखी काही वेगळे स्वरूप प्राप्त होणार काय, याकडे लक्ष लागले आहे.राहुल आवाडे - विनय कोरे भेटआमदार आवाडे आणि कोरे यांच्यात चर्चा झाल्यानंतर गुरुवारी दुपारी राहुल आवाडे यांनी पुन्हा कोरे यांची वारणानगर येथे भेट घेतली. या भेटीमुळेही पुन्हा चर्चेला ऊत आला आहे. ते कोणती भूमिका जाहीर करणार, याकडेही लक्ष लागले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhatkanangle-pcहातकणंगलेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Prakash Awadeप्रकाश आवाडेVinay Koreविनय कोरे