शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

खरेदीच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीप्रमुखास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 17:38 IST

खरेदी करण्याचा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या  आंतरराज्य टोळीतील प्रमुखास कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली. त्याच्याकडून नामांकित कंपन्यांची घड्याळे, कॅमेरे, मोबाईल असा सुमारे तीन लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वस्तूंच्या खरेदीचा बहाणा करून फसवणूक केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

ठळक मुद्देघड्याळे, लॅपटॉप, कॅमेरे, मोबाईल असा सुमारे साडेतीन लाखांचा माल जप्त कोल्हापूर पोलिसांची कारवाई, कोल्हापुरातील चोरीचा छडावस्तूंच्या खरेदीचा बहाणा करून फसवणूक केल्याची माहिती तपासात पुढे

कोल्हापूर : खरेदी करण्याचा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या  आंतरराज्य टोळीतील प्रमुखास कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली. त्याच्याकडून नामांकित कंपन्यांची घड्याळे, कॅमेरे, मोबाईल असा सुमारे तीन लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अनिल तुळशीराम जोशी (वय ३७, शांतीनगर, मास्टरवाडी, मालाड (पश्चिम) मुंबई) असे संशयित टोळीप्रमुखाचे नाव आहे. त्याने कोल्हापुरातून नामांकित कंपनीची १५, तर नागपुरातून १० घड्याळे तसेच चेन्नईतून दोन लॅपटॉप, रायपुरातून तीन कॅमेरे, डेहराडून येथून १०, तर विशाखापट्टणम येथून सहा मोबाईल अशा वस्तूंच्या खरेदीचा बहाणा करून फसवणूक केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, कावळा नाका येथील एका तारांकित हॉटेलमधून दोन महिन्यांपूर्वी नामांकित कंपनीची घड्याळे अशाच पद्धतीने फसवणूक करून सुमारे १५ लाख ८०० रुपयांची घड्याळे विक्रम शर्मा असे खोटे नाव सांगून अनिल जोशी व त्याच्या साथीदारांनी नेली होती. साईक्स एक्स्टेन्शन येथील एका घड्याळाच्या दुकानदाराला हा गंडा घातला होता. याबाबत शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. तपासात अनिल जोशी याने ही फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, पोलिसांनी महाराष्ट्रात पूर्वी अशा प्रकारचे गुन्हे घडलेल्या ठिकाणांची माहिती घेतली. २०१२ मध्ये सहार पोलीस ठाणे, मुंबई येथे असा गुन्हा घडला असल्याचे समजले. त्यानुसार तेथून संशयित आरोपीचे छायाचित्र व कोल्हापुरातील या हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज जुळविले असता संशयित अनिल तुळशीराम जोशी व त्याचे साथीदार यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी जोशी याची माहिती घेतली असता चार वर्षांपासून वडोदरा (गुजरात) तो येथे राहत असल्याची तसेच आईला मालाड येथे भेटण्यासाठी अधून-मधून येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वडोदरा या ठिकाणी जाऊन अनिल जोशी याचा छायाचित्राद्वारे शोध घेतला. त्यावेळी सध्या तो मालाड या ठिकाणी राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मालाडला जाऊन त्याला पकडून कोल्हापुरात आणले. त्याला शाहूपुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय मोहिते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, उपनिरीक्षक राजेंद्र सानप, युवराज आठरे, अमोल माळी व पोलीस कॉन्स्टेबल सुजय दावणे, आसिफ कलायगार, श्रीकांत पाटील, संजय कुंभार, राजू आडूळकर, संजय हुंबे, किरण गावडे, प्रदीप नाकील, अमित सर्जे, राजेंद्र निगडे, अमर वासुदेव, अमर आडसुळे, महादेव गुरव यांनी केली. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस