आंतर निवासी डॉक्टरास मारहाण; लिपिकावर गुन्हा

By Admin | Updated: July 17, 2014 00:39 IST2014-07-17T00:38:57+5:302014-07-17T00:39:11+5:30

माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागविल्याचा राग

Intermediate driving doctorate; Crime on the script | आंतर निवासी डॉक्टरास मारहाण; लिपिकावर गुन्हा

आंतर निवासी डॉक्टरास मारहाण; लिपिकावर गुन्हा

कोल्हापूर : माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागविल्याचा राग मनात धरून सीपीआरमधील लिपिकाने आंतर निवासी डॉक्टरास लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यामध्ये जगन्नाथ मुकुंद नार्वेकर (वय २९, रा. विद्यार्थी वसतिगृह सीपीआर, मूळ गाव कणकवली) हे गंभीर जखमी झाले. सीपीआरच्या मुख्य इमारतीत आज, बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास हा प्रकार घडल्याने गोंधळ उडाला. अखेर नार्वेकर यांनी संशयित लिपिक अजय गुजर यांच्याविरोधात सीपीआर पोलीस चौकीत फिर्याद दिली.
याबाबत पोलिसांनी सांगितले, मुकुंद नार्वेकर हे प्रशिक्षणार्थी आंतर निवासी डॉक्टर म्हणून सीपीआरमध्ये काम करतात. त्यांच्या नावे माहितीच्या अधिकाराखाली अर्ज आल्याने त्यांना गुजर यांनी बोलावून घेतले. ते गेले असता मी गुजर आहे, काय माहिती पाहिजे आहे तुला, अशी त्यांनी विचारणा केली. त्यांनी मी असा अर्ज केलेलाच नाही, मला अर्ज पाहू द्या, असे म्हणताच त्यांना गुजर यांनी रागाने त्यांना बेदम मारहाण केली. यामध्ये त्यांच्या उजव्या गालावर जखम झाली. या प्रकाराने कार्यालयात गोंधळ उडाला. त्यानंतर नार्वेकर हे स्वत: अपघात विभागात उपचार करण्यासाठी आले. यावेळी त्यांनी ही माहिती सीपीआर पोलीस चौकीत दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर उशिरा गुजर यांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)

Web Title: Intermediate driving doctorate; Crime on the script