शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

GokulMilk Election- इच्छुक उमेदवारांनी किमान दहा लिटर दुध न थकता काढून दाखवावे : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 15:43 IST

Raju Shetty GokulMilk Election Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यात  गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी किमान दहा लिटर दुध न थकता काढून दाखवावे अशी अट घालण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

ठळक मुद्देइच्छुक उमेदवारांनी किमान दहा लिटर दुध न थकता काढून दाखवावे : राजू शेट्टीमहादेवराव महाडिक यांनी घेतली माजी खासदार राजू शेट्टी यांची भेट

कोल्हापूर : जिल्ह्यात  गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी किमान दहा लिटर दुध न थकता काढून दाखवावे अशी अट घालण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.गोकुळ दूध संघावर गेली 25 वर्षे एकहाती सत्ता असलेल्या महादेवराव महाडिक यांच्यासमोर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मोठं आव्हान उभं केले आहे. महादेवराव महाडिक यांनी बुधवारी सकाळी माजी खासदार राजू शेट्टी यांची भेट घेतली. गोकुळ हा अर्धा ते एक लिटर दूध उत्पादन करणाऱ्या सर्वसामान्य उत्पादकांचा संघ आहे आणि त्यावर कब्जा करण्यासाठी आता अनेक जण पुढे आले आहेत. त्यामुळे गोकुळ वाचवायचं असेल तर तुमची सोबत हवी असे साकडे महाडिकांनी राजू शेट्टींना घातले आहे.

ज्यांना ही निवडणूक लढवायची आहे त्यांनी गोकुळमधून किमान 30 टन पशुखाद्य घेतले असले पाहिजे अशी अटही असल्याचं त्यांनी स्पष्ट केले, त्यावर गोकुळ दूध संघ हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा राहिला पाहिजे असं वाटत असेल तर इतर अटींप्रमाणे सर्वच इच्छुकांनी न थकता किमान दहा लीटर दूध काढून दाखवावे, अशी अट घालण्याची मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. गोकुळच्या निवडणुकीत नेत्यांच्याच मुलांना अधिक अर्ज भरल्याचं दिसत आहे, असंही राजू शेट्टी म्हणाले.

महादेवराव महाडिक यांनी जरी आज भेट घेतली असली तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्णय अजून कळवलेला नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करुन दोन दिवसात आपला निर्णय कळवणार आहेत. - राजू शेट्टी, माजी खासदार, नेते , स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीGokul MilkगोकुळMahadevrao Mahadikमहादेवराव महाडिकkolhapurकोल्हापूर