शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

पूरग्रस्त व्यापाऱ्यांच्या सर्व कर्जावरील व्याज सहा महिन्यांसाठी घेऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 11:38 IST

महापुरामुळे जिल्ह्यातील व्यापारी, व्यावसाईक यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये शहरातील शाहुपुरी, लक्ष्मीपुरील व्यावसाईकांची संख्या मोठी आहे. कर्ज काढून सुुरु केलेला व्यवसायच पाण्यात गेल्याने हप्ते फेडणे व व्याज भरणे शक्य नाही. त्यामुळे व्यापारी व्यावसाईकांच्या सर्व तऱ्हेच्या कर्जावरील व्याज ५ आॅगस्टपासून सहा महिन्यांसाठी बॅँकांनी घेऊ नयेत. असे आदेश त्यांना द्यावेत, यासह विविध मागण्यांचे निवेदन शिवसेना व व्यापाऱ्यांच्या व्यापक शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.

ठळक मुद्देपूरग्रस्त व्यापाऱ्यांच्या सर्व कर्जावरील व्याज सहा महिन्यांसाठी घेऊ नये जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : शिवसेनेसह व्यापारी, व्यावसाईकांनी दिले निवेदन

कोल्हापूर : महापुरामुळे जिल्ह्यातील व्यापारी, व्यावसाईक यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये शहरातील शाहुपुरी, लक्ष्मीपुरील व्यावसाईकांची संख्या मोठी आहे. कर्ज काढून सुुरु केलेला व्यवसायच पाण्यात गेल्याने हप्ते फेडणे व व्याज भरणे शक्य नाही. त्यामुळे व्यापारी व्यावसाईकांच्या सर्व तऱ्हेच्या कर्जावरील व्याज ५ आॅगस्टपासून सहा महिन्यांसाठी बॅँकांनी घेऊ नयेत. असे आदेश त्यांना द्यावेत, यासह विविध मागण्यांचे निवेदन शिवसेना व व्यापाऱ्यांच्या व्यापक शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी देसाई यांची भेट घेऊन निवेदन सादर करुन सविस्तर चर्चा केली. या पुरामुळे व्यापारी, व्यावसाईक पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. त्यांना उभे राहण्यासाठी शासनपातळीवर मदत होणे गरजेची आहे, असे पवार यांनी सांगितले.निवेदनातील प्रमुख मागण्या अशा, सहा महिन्यानंतर पुढील सहा महिन्यांसाठी व्याज आकारणी करुन ती स्वतंत्र लिहून ठेवावी, परंतु व्याजावर व्याज, दंडव्याज आकारले जाऊ नये, मुदती कर्जात कर्जदारांना विनंतीनुसार कर्जमुक्त, कर्जहप्ता यांची फेररचना करुन घ्यावी, राष्ट्रीय, राज्य आपदा राहत कोष, शासन आदीकडून मिळणारी अंतिम मदत किंवा विमा परतावा जो कर्ज खात्यास परस्पर जमा होईल तो बॅँकेने कर्जास जमा करुन घेऊ नये, बॅँकांनी पूरग्रस्त कर्जदारांच्या बाबतीत कर्ज कॅश क्रेडीट स्वरुपाचे असल्यास ५ आॅगस्ट २०१९ रोजी कर्जमर्यादा होती तीच किमान पुढील १२ महिने विना बदल वापरण्याची जागा मिळावी.

कर्जदाराने बॅँकेस तारण दिलेल्या मालाची स्थावर, जंगम मालमत्तेची मासिक बाजारभावाने होणारी किंमत यावर त्याची उचलीची मर्यादा ठरते, पुरामुळे तारण नाहीसे झाले असेल किंवा त्याचे बाजारमुल्य घटले असेल, त्यामुळे कर्जदाराची किमान मंजूर मर्यादा वापरण्याची परवानगी त्याला मिळावी.यावेळी नगरसेवक राहुल चव्हाण, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख शिवाजी जाधव, दिलीप शेटे,अमर समर्थ, संजय शेटे, गिरिष साटम, शशिकांत बिडकर, शैलेश पुणेकर, कमलाकर जगदाळे, रणजीत आयरेकर, हर्षल सुर्वे, मनजित माने, कपिल डोईफोडे, शिवाजी पाटील, प्रवीण पालव, राजू जाधव, अभिजीत बुकशेठ आदी उपस्थित होते.

पूरग्रस्त व्यापाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने  जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी शशिकांत बिडकर, सुजित चव्हाण, दिलीप शेटे, शिवाजी पाटील, अमर समर्थ, संजय शेटे आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरShiv Senaशिवसेना