संवादकौशल्य ही विद्यार्थ्यांची जमेची बाजू

By Admin | Updated: March 13, 2015 00:23 IST2015-03-13T00:03:43+5:302015-03-13T00:23:52+5:30

शंकर नावले : विद्यापीठात मायक्रोस्ट्रीप अँटिना कार्यशाळा

Intercourse is the combination of students' credentials | संवादकौशल्य ही विद्यार्थ्यांची जमेची बाजू

संवादकौशल्य ही विद्यार्थ्यांची जमेची बाजू

कोल्हापूर : भारतात उद्योगांचा शिक्षणक्षेत्रावर प्रभाव पडतो; परंतु प्रगत देशांत शिक्षणाचा उद्योगांवर वरचष्मा असतो. भारतीय विद्यार्थ्यांची कष्टाळू वृत्ती, संवादकौशल्य, उत्तम गणिती पाया या जमेच्या बाजू असून त्या जोरावर जगात कुठेही यशस्वी होण्याची क्षमता त्यांच्यात आहे, असे प्रतिपादन सोलापूरच्या सिंहगड कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. शंकर नावले यांनी केले.शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागाच्या इलेक्ट्रॉनिक्स शाखेमार्फत मायक्रोस्ट्रीप अँटिना डिझाईन, टेस्टिंग, परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन, अ‍ॅप्लिकेशन्स या विषयांवरील कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमास तंत्रज्ञान विभागाचे संचालक डॉ. गिरीश कुलकर्णी, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. साहू, टेक्विप-२ चे समन्वयक प्रा. श्रीकांत भोसले, प्रा. एस. एस. शिरगण, प्रा. जयेंद्र कुमार, प्रा. उदय पाटील, यू. एल. बोबले उपस्थित होते. कार्यशाळेत अभियांत्रिकीच्या ६८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
आज ‘ई फेस्ट-सिग्नस 2 के 15’ स्पर्धा
तंत्रज्ञान अधिविभागाच्या इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी शाखेतर्फे आज, शुक्रवारी ‘ई फेस्ट-सिग्नस २ के १५’ या तंत्रउत्सव होणार आहे. उत्सवात रोबो रेस, निर्मिती (प्रोजेक्ट मॉडेल), व्हिजन-पोस्टर प्रेझेंटेशन, ब्रेनकॅफे-प्रश्नमंजूषा या स्पर्धा होणार आहेत.

Web Title: Intercourse is the combination of students' credentials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.