शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुलीचा आंतरजातीय विवाह; रागातून सास-याने जावयाच्या अंगावर घातला टेम्पो, कोल्हापुरातील घटना

By उद्धव गोडसे | Updated: March 1, 2023 15:59 IST

तरुणीने दीड वर्षांपूर्वी गावातीलच तरुणाशी प्रेमविवाह केला होता

कोल्हापूर : मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून तिच्या वडिलांनी जावयासह त्याच्या मित्राला टेम्पोने उडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना राशिवडे बुद्रक (ता. राधानगरी) येथे मंगळवारी (दि. २८ फेब्रुवारी) घडली.

यात जावई प्रतीक तानाजी लुगडे (वय २३) आणि त्याचा मित्र संतोष तानाजी पोवार (२८, दोघेही रा. राशिवडे बुद्रुक) हे दोघे जखमी झाले असून, सासरा विजय मधुकर आजमाने (५०, रा. राशिवडे बुद्रुक) याला राधानगरी पोलिसांनी अटक केली.राधानगरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राशिवडे बुद्रुक येथील लिंगायत समाजातील तरुणीने दीड वर्षांपूर्वी गावातीलच मराठा समाजातील प्रतीक लुगडे याच्याशी प्रेमविवाह केला. मुलीचा प्रेमविवाह मान्य नसल्याच्या रागातून तिचे वडील विजय आजमाने सतत लुगडे कुटुंबास त्रास देत आहेत.

मंगळवारी दुपारी प्रतीक लुगडे हा त्याची आई सुधा लुगडे आणि मित्र संतोष याच्यासह शेतात निघाला होता. त्यावेळी पाठीमागून टेम्पो घेऊन आलेला सासरा विजय आजमाने याने प्रतीक आणि संतोष यांच्या अंगावर टेम्पो घातला. या घटनेत दोघे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले असून, उपचारानंतर त्यांची प्रकृती ठिक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.या घटनेनंतर जखमी प्रतीक लुगडे याची आई सुधा यांनी राधानगरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी विजय आजमाने याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक केली.जीवे मारण्याचा दुसरा प्रयत्नविजय आजमाने याने जानेवारी २०२३ मध्ये जावई प्रतीक याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. मुलगी आणि जावई यापैकी एकाला तरी संपवणारच अशी धमकी त्याने दिल्याचे जखमी प्रतीक याने पोलिसांना सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस