पुरोगामी संघटनांची ‘सिनेट’साठी एकजूट
By Admin | Updated: July 4, 2015 00:44 IST2015-07-04T00:43:50+5:302015-07-04T00:44:30+5:30
पदाधिकारी बैठकीत निर्धार : निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का देणार

पुरोगामी संघटनांची ‘सिनेट’साठी एकजूट
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ अधिसभेची (सिनेट) निवडणूक आॅक्टोबरमध्ये होणार आहे. त्यासाठी १८ पुरोगामी पक्ष, संघटनांची एकजूट झाली आहे. संघटनांची पहिली बैठक गुरुवारी (दि. २) विद्यापीठात झाली.
विद्यापीठातील ग्रंथालयासमोर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीत प्रतिगामी संघटना वगळता अन्य सर्व पुरोगामी संघटनांच्या एकजुटीतून पुरोगामी ऐक्याची ताकद वाढविण्याचे निश्चित करण्यात आले. शिवाय प्रस्थापितांना या निवडणुकीत पराभवाची धूळ चाखायला लावून धक्का देण्याचा निर्धारही केला. निवडणुकीच्या तयारीसाठी पक्ष, संघटनांशी मॅरेथॉन बैठका घेण्यासह चार दिवसांत पॅनेल, उमेदवार आणि जाहीरनामा घोषित करण्याचे ठरविले.
बैठकीस प्रा. डॉ. मेघा पानसरे, रणजित चव्हाण, नीलेश चव्हाण, विकास जाधव, सुभाष देसाई, नंदकिशोर सुर्वे, शरद मिराशी, गौतम कांबळे, अनुप्रिया कदम, अमोल गाडे, जयवंत पोवार, राजेंद्र पोवार, अजित खिलारे, सुनीता अमृतसागर, सुशांत पाटील, अथर्व चव्हाण, अमोल महापुरे, सुनील गोटखिंडे, प्रशांत चांदणे, राजेश पवार, सना कच्छी, प्रियांका धनवडे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
संघटित झालेले पक्ष, संघटना
संभाजी ब्रिगेड, ब्लॅक पँथर, मराठा सेवा संघ, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन, भारतीय महिला फेडरेशन, विद्रोही विद्यार्थी संघटना, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मावळा ब्रिगेड, युनिव्हर्सिटी स्टुडंट्स असोसिएशन, विश्व लिंगायत महासभा, अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान, डॉ. आंबेडकर यूथ असोसिएशन, शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समिती, अखिल भारतीय नौजवान सभा, आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन, जिजाऊ ब्रिगेड.