‘हिंदकेसरीं’च्या मदतीसाठी अखंड झरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:51 IST2018-10-03T00:51:00+5:302018-10-03T00:51:04+5:30

‘हिंदकेसरीं’च्या मदतीसाठी अखंड झरा
कोल्हापूर : फुप्फुसांच्या गाठी व प्रोस्टेट ग्रंथी वाढल्याने त्रस्त असलेल्या हिंदकेसरी दीनानाथसिंह यांच्यावर शस्त्रक्रियेसाठी सलग पाचव्या दिवशीही मदतीचा झरा अखंड सुरूच आहे. मंगळवारी दिवसभर अनेकजणांनी भेट घेत सुमारे लाखाची मदत केली. मुख्यमंत्री सहायता निधीकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन आमदार चंद्रदीप नरके यांनी दिले.
करवीरनगरीचा नावलौकिक साऱ्या देशभर करणाºया व कर्मभूमी म्हणून हिंदकेसरी किताब पटकावल्यानंतरही येथेच वास्तव्यास असणारे दीनानाथसिंह हे डाव्या फुप्फुसात रक्ताच्या दोन गाठी व प्रोस्टेट ग्रंथींच्या वाढीमुळे त्रस्त आहेत. प्रोस्टेट ग्रंथींवर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. मंगळवारीही वसई-विरार महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, गोल्ड माईन स्टॉक लिमिटेडचे प्रादेशिक प्रमुख किशोर धारे, संदीप यादव, जमीर मुल्लाणी, तानाजी शिंदे, संदीप पाटील, कमलेश तांदळे आणि मित्र परिवारातर्फे रोख एक लाख रुपयांची मदत दिली. ज्या क्रीडाप्रेमींना हिंदकेसरी दीनानाथसिंह यांना मदत करावयाची आहे, त्यांनी दीनानाथ अतरनारायण सिंह - स्टेट बँक आॅफ इंडिया खाते क्रमांक १०५५७५४८९५८ व आयएफएससी कोड - एसबीआयएन ००१५५५७ यावर करावी असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांनी केले आहे.
नरके यांच्याकडून प्रकृतीची विचारपूस
आमदार नरके यांनीही ‘हिंदकेसरीं’च्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी ‘मुख्यमंत्री सहायता निधी’मधून पाच लाखांची तातडीची मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.