सी, डी वॉर्डात अपुरा पाणीपुरवठा; गळती काढली

By Admin | Updated: August 23, 2015 17:53 IST2015-08-23T17:47:14+5:302015-08-23T17:53:59+5:30

आजपासून पाणीपुरवठा पूर्ववत : पाण्यासाठी नागरीकांची तारंबळ

Insufficient water supply in C, D Ward; Leak removed | सी, डी वॉर्डात अपुरा पाणीपुरवठा; गळती काढली

सी, डी वॉर्डात अपुरा पाणीपुरवठा; गळती काढली

कोल्हापूर : रंकाळवेस बसस्थानक परिसरातील जुन्या काळातील ७०० एमएम जाडीच्या जलवाहिनीला लागलेली गळती काढण्यात अखेर शनिवारी रात्री उशिरा पाणीपुरवठा विभागाला यश आले. गळती काढण्यासाठी या जलवाहिनीचा पाणीपुरवठा गेल्या दोन दिवसांपासून बंद ठेवण्यात आला होता. जलवाहिनी दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्याने रविवारपासून पूर्ववत पाणीपुरवठा होईल, असे सांगण्यात आले.
बालिंगा जलशुद्धिकरण केंद्रावर अवलंबून असलेल्या चंबुखडी पाण्याच्या टाकीपासून रंकाळवेसमार्गे शाहूपुरीपर्यंत ७०० एमएम जाडीची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. ही जलवाहिनी खूप जुनी असून ती खराब झाली आहे. रंकाळा बसस्थानक परिसरात या जलवाहिनीला गळती लागली होती. ती गुरुवारी रात्रीपर्यंत दुरुस्त करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी पूर्ववत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला परंतु याच जलवाहिनीला थोड्याच अंतरावर आणखी एक मोठी गळती लागली असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पुन्हा खुदाई करून गळती असलेल्या जलवाहिनीचा शोध घेण्यात आला. शनिवारी दिवसभर गळती काढण्याचे काम सुरू होते. सायंकाळी ते पूर्ण झाले.
चंबुखडीहून आणलेली ही जलवाहिनी अत्यंत जुनी असल्याने वाहनांमुळे रस्त्यावर पडणाऱ्या दाबामुळे ती फुटली. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यामुळे आता रविवारपासून सुरळीत पाणीपुरवठा होईल, असे सांगण्यात आले. दरम्यान, जलवाहिनी दुरुस्तीच्या काळात अन्य मार्गावरून सी व डी वॉर्डाला पाणीपुरवठा करण्यात आला, परंतु त्याला पुरेसा दाब नव्हता. कमी व अपुरा दाबाने पाणीपुरवठा झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Insufficient water supply in C, D Ward; Leak removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.